IND vs WI Delhi Test : 518 धावांवर टीम इंडियाने घोषित केला डाव, शुभमन गिलने ते केलं जे विराटला देखील जमलं नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs WI 2nd Test, Shubhman Gill : शुभमन गिलने 10 वं शतक ठोकत मोठा विक्रम नावावर केला आहे. शुभमन गिल याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या इतिहासात रेकॉर्ड रचलाय.
India vs West Indies Test Series : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि धडाकेबाज कर्णधार शुभमन गिलने ऐतिहासिक कामगिरी केली. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंगचे प्रदर्शन करत 518 धावांवर आपला डाव घोषित केला. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 518 धावांचा डोंगर उभारला आहे. यावेळी शुभमन गिलने असा रेकॉर्ड रचलाय, जो विराट कोहलीला देखील जमला नव्हता.
टेस्ट करियरमधील 10 वं शतक पूर्ण
पहिल्या डावात भारताकडून युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 175 धावांची दमदार इनिंग खेळली, मात्र तो रन-आऊट झाल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. काल बचावात्मक खेळणारा गिल आज अधिक प्रवाही फलंदाजी करताना दिसला आणि त्याने आपल्या टेस्ट करियरमधील 10 वं शतक पूर्ण केलं. युवा फलंदाज साई सुदर्शन कालच्या दिवशी केवळ 13 धावांनी आपलं पहिले टेस्ट शतक हुकलं. आज नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांनी जलद गतीची फलंदाजी करत भारताची धावसंख्या 500 च्या पार नेली.
advertisement
WTC च्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा
शुभमन गिलने 10 वं शतक ठोकत मोठा विक्रम नावावर केला आहे. शुभमन गिल याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा मान नावावर केला आहे. त्याआधी रोहित शर्माच्या नावावर 9 शतकांचा रेकॉर्ड होता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा शुभमन गिलने केल्या आहेत, ज्यांच्याकडे 2771 धावा आहेत. त्याने 39 कसोटी सामन्यांमध्ये 71 डावांमध्ये 42.63 च्या सरासरीने ही कामगिरी केली.
advertisement
खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी प्रभावी
दरम्यान, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दिवसभर कठोर परिश्रम करावे लागले. डावखुरा फिरकी गोलंदाज वारिकन हा त्यांच्यासाठी सर्वात यशस्वी बॉलिंग करणारा ठरला, त्याने तीन विकेट्स घेतल्या. सध्याच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी फारशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 11, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI Delhi Test : 518 धावांवर टीम इंडियाने घोषित केला डाव, शुभमन गिलने ते केलं जे विराटला देखील जमलं नाही!