ना शेअर ना म्युच्युअल फंड सोन्याने दिले 180% टक्के रिटर्न, अजूनही छप्परफाड कमाईची संधी? एक्सपोर्ट म्हणतात...

Last Updated:

गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या दरात १८०% वाढ झाली असून, दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १,२६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. गोल्डमॅन सॅक्सने आणखी वाढीचा अंदाज वर्तवला आहे.

News18
News18
गेल्या काही वर्षांपासून सोनं गुंतवणूकदारांसाठी सोन्याची कोंबडी देणाऱ्या अंड्यासारखं ठरले आहे. विशेषतः गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या दरात जी तुफान वाढ झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ४००० डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, गेल्या तीन वर्षांत सोन्याने तब्बल १८० टक्क्यांची उसळी घेतली आहे.
रिकॉर्डब्रेक वेग आणि सध्याचे दर
सोन्याच्या किमतीतील वाढीचा वेग इतका जबरदस्त आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात शेवटची १,००० डॉलरची वाढ केवळ २०७ दिवसांमध्ये झाली आहे. भारतीय बाजारातही सोन्याची चमक कायम आहे. दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव आज, शुक्रवारी १,२६,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला. भारतात सन २०२५ मध्येच सोन्याच्या दरात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, या विक्रमी तेजीनंतर आता गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की, आता सोनं घ्यावं का? खरेदी केलं तर कमी होईल की वाढेल, मला तेवढा फायदा होईल का?
advertisement
करेक्शनची शक्यता
काही विश्लेषकांचे मत आहे की, सोने सध्या 'ओवरबॉट झोन' मध्ये पोहोचले आहे. म्हणजे याची किंमत खूप वेगाने वाढली आहे आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) सूचित करते की, येत्या काही महिन्यांत किमतीत थोडी 'करेक्शन' (घट) होण्याची शक्यता आहे. थोडक्यात, गुंतवणूकदारांनी नफा काढल्यामुळे (Profit Booking) तात्पुरती घसरण पाहायला मिळू शकते.
तेजी कायम राहणार
याउलट, गोल्डमॅन सॅक्स सारख्या मोठ्या वित्तीय संस्थांचे मत आहे की, सध्याची परिस्थिती सोन्याच्या पूर्णपणे बाजूने आहे आणि त्याची ही वाढ कायम राहील. गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार, सोन्याचा दर २०२६ च्या अखेरपर्यंत $४,९०० (४ हजार ९०० डॉलर) प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच, यात सध्याच्या दरापेक्षा २२.५% अधिक वाढ अपेक्षित आहे. हा अंदाज खरा ठरल्यास, भारतात सोन्याचा दर साधारणपणे ₹१.३७ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, जगभरातील मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ गुंतवणूकदार सोन्याची मागणी सातत्याने वाढवत आहेत.
advertisement
सोने ठरले सर्वात फायदेशीर गुंतवणूक
जागतिक बाजारपेठेत जेव्हा अनिश्चिततेचे वातावरण होते, तेव्हा म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये सोन्याचा दर सुमारे $१,४३७ प्रति औंस होता. अवघ्या तीन वर्षांत, ऑक्टोबर २०२५ मध्ये तो $४००० वर पोहोचला. याचा अर्थ, सोन्याने १८०% चा जबरदस्त परतावा दिला आहे.
गुंतवणुकीच्या भाषेत सांगायचे झाल्यास, सोन्याचा वार्षिक सरासरी परतावा सुमारे ४०% राहिला आहे. विशेष म्हणजे, २०२२ आणि २०२३ मध्ये सोन्याने २०-२०% ची वाढ दिली, तर २०२५ या एकाच वर्षात सोन्याच्या दरात ५३% पर्यंत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. १, ३, ५, १० आणि २० वर्षांच्या काळात सोन्याने अनुक्रमे ४७%, ३३%, १५%, १३% आणि ११% असा मजबूत परतावा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ना शेअर ना म्युच्युअल फंड सोन्याने दिले 180% टक्के रिटर्न, अजूनही छप्परफाड कमाईची संधी? एक्सपोर्ट म्हणतात...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement