रविवारीच डॉक्टरांनी प्रेम सागर यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता, पण आज सकाळी 10 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुपारी मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत त्यांचं अंत्यसंस्कार पार पडले.
'कॅन्सरने तिची पाठ सोडली नाही..' सुबोध भावेंची बहिण प्रिया मराठेसाठी इमोशनल पोस्ट
प्रेम सागर हे रामानंद सागर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध निर्माता शिव सागर यांचे वडील होते. ते सिनेमा आणि टेलिव्हिजन जगतातील एक महत्त्वाचे नाव मानले जात होते. प्रेम सागर हे पुण्यातील FTII (Film and Television Institute of India) चे 1968 च्या बॅचमधील विद्यार्थी होते. इथे त्यांनी सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतलं. याच शिक्षणामुळे त्यांचा कॅमेऱ्यावरचा दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला. वडिलांनी स्थापन केलेल्या सागर आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमधून त्यांनी अनेक प्रकल्पांना आकार दिला.
advertisement
रामानंद सागर यांची ऐतिहासिक मालिका “रामायण” ही केवळ टेलिव्हिजन मालिका नव्हती, तर ती एक सांस्कृतिक चळवळ ठरली होती. या मालिकेतील पात्रं इतकी लोकप्रिय झाली की आजही लोक अरुण गोविलला ‘राम’ म्हणूनच आठवतात. त्या मालिकेच्या यशात कॅमेऱ्यामागचं प्रेम सागर यांचं योगदानही अनमोल आहे.
रामायणासोबतच सागर कुटुंबाने निर्माण केलेल्या अनेक धार्मिक आणि पौराणिक मालिकांमध्ये प्रेम सागर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी कॅमेरा आणि दृश्य साकारण्याच्या कलेतून कथा अधिक जिवंत केली. त्यामुळेच सागर आर्ट्सच्या निर्मितीला प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान मिळालं. प्रेम सागर यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजनसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.