रितेश देशमुखची मनोज जरांगेंसाठी पोस्ट
रितेश देशमुखने X अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं, "सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत."
नेहमी नाकावर राग, पॅप्सना बघून का चिडतात जया बच्चन! अखेर स्वत:च कॅमेरासमोर येऊन सांगितलं कारण, VIDEO
advertisement
पुढे तो म्हणाला, "त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र."
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनकर्त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून लढतो आहोत. सरकारने आमचा आवाज ऐकला नाही, तर इथून उठणार नाही. आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो मिळाल्याशिवाय थांबणार नाही."