2006 पासून हा शो वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी होस्ट केला. अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, फराह खान यांसारख्या नावाजलेल्या स्टार्सनी सूत्रसंचालन केलं. पण बिग बॉस 4(2010) पासून सलमान खानने सूत्रसंचालन हाती घेतलं आणि मग हा शो म्हणजेच सलमान खान असं समीकरणच प्रेक्षकांच्या मनात पक्कं झालं.
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
advertisement
सलमानची फी – एपिसोडनुसार वाढती कमाई
बिग बॉस 11: प्रत्येकी एपिसोडसाठी तब्बल 11 कोटी रुपये.
बिग बॉस 12: फी वाढून 14 कोटी रुपये.
बिग बॉस 13: आणखी उडी 15 कोटी रुपये.
बिग बॉस 15: अफाट 20 कोटी रुपये एपिसोडमागे.
बिग बॉस 16: अफवा होती की भाईजानने 1000 कोटींचं मानधन मागितलं, पण नंतर हे गॉसिप ठरलं.
बिग बॉस 17: फी घटली, प्रत्येकी एपिसोड 12 कोटी रुपये.
बिग बॉस 18: इकॉनॉमिक टाईम्सनुसार सलमानला मिळाले 60 कोटी रुपये.
बिग बॉस 19: सध्या चर्चेतली बातमी - भाईजानने घेतले तब्बल 150 कोटी रुपये!
शोमध्ये सलमान खानचं प्रेझेन्स वेगळाच असतो. कधी तो स्पर्धकांना क्लास घेतो, कधी त्यांच्यासोबत मजा करतो. वीकेंडच्या एपिसोडमध्ये प्रेक्षक त्याची एंट्री पाहूनच उत्साहित होतात. इतकंच काय, घरातील सदस्यांनाही सलमानसमोर बोलायला घाबरायला होतं.