समीर वानखेडे यांनी या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या शोमध्ये त्यांचं “खोटं आणि अपमानास्पद चित्रण” करण्यात आलं आहे. समीर वानखेडे म्हणाले, "हा खटला वैयक्तिक शत्रुत्वाचा नाही, तर माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी कायद्याचा अधिकारी आहे आणि मी नेहमी नियमांनुसार वागलो आहे. माझं कोणाशी वैर नाही."
advertisement
'ऐश्वर्या-सलमान इतके जवळ होते की त्यांचं भांडण...' प्रसिद्ध संगीतकाराचा शॉकिंग खुलासा
2021 मध्ये शाहरुख खानसोबतचे चॅट्स लीक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र वानखेडे यांनी हे दावे फेटाळले. ते म्हणाले, 'मी ते चॅट्स न्यायालयात सादर करणार होतो, मग मी ते लीक का करू? माझ्याकडे 65B प्रमाणपत्र आहे जे पुरावा म्हणून सादर केलं जातं. कायदेशीर प्रक्रियेनुसारच मी सगळं केलं."
ऑक्टोबर 2021 मध्ये एनसीबीने क्रूझ शिपवर छापा टाकला होता. त्यात आर्यन खान आणि काही इतरांना अटक झाली होती. आर्यनने जवळजवळ तीन आठवडे तुरुंगात घालवले आणि शेवटी पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका झाली. यानंतर खान कुटुंबाने वानखेडेंवर लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला. परिणामी, सीबीआयने मे 2023 मध्ये वानखेडेंविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला. वानखेडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले.
शाहरुख खानशी वैयक्तिक वैर असल्याच्या चर्चांना उत्तर देताना वानखेडे म्हणाले, "मी खूप छोटा माणूस आहे, एक सरकारी नोकर. कोणाची वैर ठेवायची मला गरज नाही. आपण कायद्याच्या देशात राहतो, कुणाच्या विरोधात व्यक्तिगत सूड ठेवण्याचा प्रश्नच येत नाही."