प्रियाच्या निधनाने तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे तर पूर्णपणे कोलमधून गेला आहे. हे दोघेही मराठीली लोकप्रिय कपलपैकी एक होते. नुकताच शंतनूचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो प्रियाचं तोंडभरुन कौतुक करताना दिसतोय आणि त्याला बायकोवर किती अभिमान आहे हे सांगतोय. हा जुना व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
4 वर्षात शंतनू मोघेवर दुःखाचा डोंगर, एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शंतून बोलतोय, "मला हे आवर्जुन सांगावसं वाटतंय कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे घर प्रियाने घेतलंय. एक पती म्हणून मला तिच्यावर खूप अभिमान आहे. स्वकतृत्वावर, कुणाचीही मदत न घेता, लोन काढून, मेहनत करुन हे घर उभं केलंय. माझी साथ तर तिला आहेच आणि अविरत असतेच आणि राहणार आहे. पण तो मेन एक तंबू असतो तो प्रियाच आहे." itsmajja.marathi ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, 2012 मध्ये प्रियाने अभिनेता शंतनू मोघे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा लेक याच्याशी विवाह केला. या दोघांचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि समंजस नात्यात गेले. मात्र प्रियाच्या अकाली जाण्याने शंतून तुटून गेला आहे.