2015 ते 2023 दरम्यान गुंतवणूक
व्यावसायिक दीपक कोठारी यांनी 2015 ते 2023 या काळात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या Best Deal TV Pvt. Ltd. या कंपनीत 60 कोटी 48 लाख रुपये गुंतवले होते. या कंपनीद्वारे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवण्यात येत होता.
( मुंबईत देहविक्री करणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पकडलं, हाय प्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश )
advertisement
कोठारी यांच्या मते, एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टीनं स्वतः त्यांचे पैसे परत करण्याची हमी दिली होती. मात्र पुढील काळात शिल्पा शेट्टीने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यानंतरही कोठारी यांना याबाबत योग्य माहिती देण्यात आली नाही. कोठारी यांनी पुढे म्हटलं की, पैसे परत मागितले तेव्हा त्यांना सतत स्थगिती दिली गेली. तब्बल 9 वर्षे उलटून गेली तरी त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
IPC अंतर्गत गुन्हा
या प्रकरणात EOW ने भारतीय दंड संहिता (IPC) कलम 403, 406 आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. आता पोलिस गुंतवलेले पैसे कुठे वापरले गेले आणि कोणत्या उद्देशासाठी खर्च झाले याचा तपास करत आहेत.
लूकआउट नोटीस जारी
PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पोलीस शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे ट्रॅव्हेल डिटेल्स तपासत आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (LOC) जारी केलं आहे. त्यामुळे आता या कपलला देशाबाहेर जाता येणार नाही.