तमिळ चित्रपटसृष्टीत सुपरस्टार्सची कमी नव्हती, पण काही कलाकार चाहत्यांच्या मनात देवासारखी जागा मिळवतात. त्यापैकीच एक दिग्गज म्हणजे शिवाजी गणेशन. जावर जिल्ह्यात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन तमिळ चित्रपटसृष्टीचा “नटसिंह” ठरला.
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नय्या पिल्लई गणेश मूर्ती. पण जेव्हा त्यांनी रंगभूमीवर "शिवाजी कंद सम्राज्यम" या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तेव्हा प्रेक्षक एवढे भारावले की त्यांना कायमचं नाव मिळालं, शिवाजी. शिवाजी गणेशनने फक्त अभिनयच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. त्यांनी 300 हून अधिक चित्रपट केले. परशक्ती, नवरात्रि, कर्णन, थिल्लाना मोहनंबल, कप्पलोट्टिया थमिझन यांसारख्या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टारचा दर्जा दिला.
advertisement
त्यांच्या लोकप्रियतेचं वेड एवढं होतं की, चित्रपटगृहात महिला चाहते आरतीच्या थाळ्या घेऊन जात असत आणि पडद्यावर दिसणाऱ्या शिवाजींची पूजा करत असत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडले. शिवाजींना अभिनयाची ओढ लहानपणापासूनच होती. पण कुटुंबाने त्याला विरोध केला. फक्त 10व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि एका नाट्यकंपनीत सामील झाले. रंगभूमीवर ते इतके पारंगत होते की मोठमोठ्या संवादांचा पाढा पोपटासारखा म्हणत. त्यांची ही क्षमता पाहून निर्माते थक्क झाले आणि त्यांना पहिला चित्रपट मिळाला.
त्यांच्या कारकिर्दीनेच सिद्ध केलं की खरा कलाकार कोणत्याही अडथळ्यांना हरवू शकतो. शिवाजी गणेशन हे फक्त अभिनेता नव्हते तर तमिळ सिनेमा आणि चाहत्यांसाठी ते श्रद्धास्थान होते.