पण या मालिकेच्या शूटिंगदरम्यान एक प्रसंग घडला ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. मालिकेत श्वेता तिवारी लैला नावाच्या दबंग महिला गँगस्टरची भूमिका करत आहे. एका सीनमध्ये तिला भरपूर अपशब्द वापरायचे होते. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये श्वेताने अनेक आव्हानं स्वीकारली, पण हा प्रसंग तिच्यासाठी वेगळाच होता. सेटवर उभ्या राहून शिवीगाळ करायची वेळ आली आणि श्वेता अक्षरशः थरथर कापू लागली.
advertisement
'तारक मेहता' फेम अभिनेत्रीचा संसार मोडला, लग्नाच्या 15 वर्षानंतर पतीपासून घटस्फोट
त्यावेळी तिच्या मदतीला तमन्ना भाटिया पुढे आली. तमन्नाने श्वेताचा हात धरला आणि मोठ्याने डायलॉग्स म्हणायला सुरुवात केली. तमन्नाच्या आत्मविश्वासाने श्वेताला धैर्य मिळालं आणि तिने हा सीन उत्तमरीत्या पूर्ण केला. श्वेताने हसत सांगितलं, “त्या क्षणी तमन्ना माझ्यासाठी को-स्टार नव्हती, ती खरी मैत्रीण होती. तिच्यामुळे मी हा सीन करू शकले, हे मी आयुष्यभर लक्षात ठेवणार.”
ही वेब सिरीज धर्मॅटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असून निर्माते करण जोहर, आदर पूनावाला आणि अपूर्व मेहता आहेत. दिग्दर्शन कॉलिन डी’कुन्हा आणि अर्चित कुमार यांनी केले आहे. पटकथा नंदिनी गुप्ता, आर्ष वोरा आणि मिथुन गंगोपाध्याय यांची आहे. ‘डू यू वॉना पार्टनर’ 12 सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे आणि चाहत्यांना एक भन्नाट मैत्री, संघर्ष आणि मजेशीर प्रवास अनुभवायला मिळणार आहे.