TRENDING:

Bigg Boss 19 च्या घरात शिरला साप, घरात भीतीचं सावट; या स्पर्धकाने हाताने पकडला

Last Updated:

Bigg Boss 19 : सलमान खानचा चर्चित असणारा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' ची एक नवी अपडेट समोर आली आहे. एका थरारक घटनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सलमान खानचा चर्चित असणारा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' ची एक नवी अपडेट समोर आली आहे. एका थरारक घटनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. घराच्या बेडरूम परिसरात अचानक एक जिवंत साप शिरला आणि काही क्षणांतच सर्वत्र गोंधळ उडाला. या घटनेनं प्रेक्षकही चिंतेत पडले.
Bigg Boss 19 च्या घरात शिरला साप
Bigg Boss 19 च्या घरात शिरला साप
advertisement

ही घटना घडली तेव्हा स्पर्धक रात्री गप्पा मारत होते. अभिनेता गौरव खन्ना यांनी सर्वात आधी या विषारी सापाला पाहिले. त्यांनी ओरडताच इतर सदस्य बेडरूममधून बाहेर पळाले. काही सदस्य तर भीतीने थरथरत होते. "बिग बॉस" ने तात्काळ घोषणा करत सर्वांना बागेत जाण्यास सांगितले, जेणेकरून कोणीही जखमी होणार नाही.

अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश

advertisement

दरम्यान, मृदुल तिवारीने आपली धाडसी बाजू दाखवत सापाला हाताने पकडले आणि सुरक्षितरीत्या बाटलीत बंद केले. त्यांच्या या धाडसामुळे घरातील सर्व सदस्य सुटकेचा श्वास घेताना दिसले.

साप दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही शोमध्ये अशा अफवा पसरल्या होत्या, मात्र निर्मात्यांनी तो व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले होते. यावेळी मात्र घटना खरी असल्याचे सिद्ध झाले आहे, तरीही चॅनलकडून अधिकृत निवेदन आलेले नाही. याच आठवड्यात घरातून आठ सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड आहेत. अशनूर कौर, नेहल चुडासमा, अमाल मलिक, कुनिका सदानंद, नीलम गिरी, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि झीशान कादरी यांच्या टेंशनमध्ये या घटनेने आणखी भर घातली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 च्या घरात शिरला साप, घरात भीतीचं सावट; या स्पर्धकाने हाताने पकडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल