लाल सूटमध्ये पूजा, पण घर 'रॉयल'!
सामंथा रुथ प्रभूने आज इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाचा सूट परिधान करून अत्यंत शांत आणि साध्या पद्धतीने गृहप्रवेशाच्या पूजेला बसलेली दिसत आहे. तिच्या या साधेपणाने चाहत्यांना पुन्हा एकदा तिचे फॅन बनवले आहे.
advertisement
इतर फोटोंमध्ये तिने आपल्या भव्य हॉल रूमची, सुंदर पूजा खोलीची आणि तिच्या लाडक्या पाळीव श्वानासोबतच्या वेगवेगळ्या जागांची झलक दाखवली आहे. एका फोटोत ती तिच्या घरात असलेल्या जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती आपल्या पेट्ससोबत खेळत आहे. सामंथाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर उचलली मोठी पाऊले
सामंथाने व्यावसायिक आयुष्यात मोठी उंची गाठली आहेच, पण वैयक्तिक आयुष्यातही ती खूप पुढे गेली आहे. अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता तिने बॉलिवूडमध्येही जोरदार एंट्री केली. अभिनेत्री म्हणून तिने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता ती लवकरच 'रक्त ब्रह्मांड : द ब्लडी किंगडम' मध्ये दिसणार आहे.