‘यापेक्षा ही गोष्ट जास्त महत्त्वाची!’
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, कबुतरांचा मुद्दा आणि हिंदी सक्ती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या सगळ्यावरून सुमीतने त्याचा संताप व्यक्त केला. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर 'डिजिटल इनोव्हा आफ्रिका' नावाच्या पेजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक वेगळं तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या रस्त्यांची माहिती दिली आहे.
advertisement
हा व्हिडिओ शेअर करताना सुमीतने लिहिलं, “रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या देशात आणि राज्यात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कृपा करून हे बघा.” त्याने थेट गडकरी आणि फडणवीस यांना टॅग करून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही सुमीतने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिलं आहे, “मी वर्षानुवर्षं हे सांगतोय, कृपया ऐका.”
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
सुमीतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जर्मनीमधील अभियंत्यांनी तयार केलेल्या एका खास रस्त्याचं तंत्रज्ञान दाखवलं आहे. हा रस्ता फक्त दगडाची पावडर वापरून तयार केला आहे, ज्यामुळे पावसाचं पाणी काही मिनिटांत शोषून घेतलं जातं आणि रस्त्यावर पाणी साचत नाही. सुमीतच्या या पोस्टला आता अनेक लोक पाठिंबा देत आहेत. त्याने या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधल्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.