TRENDING:

Govinda-Sunita Ahuja: 'गोविंदाशी लग्न केलं कारण...' सुनीता आहुजांनी सांगितली लग्नाची Inside Story!

Last Updated:

Govinda-Sunita Ahuja:बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. चाहत्यांमध्ये यामुळे खूपच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, गोविंदा आणि सुनीता यांच्यात सर्व काही सुरळीत आहे. जुन्या गोष्टी लोक पुन्हा पसरवत आहेत.
सुनीता आहुजांनी सांगितली लग्नाची Inside Story!
सुनीता आहुजांनी सांगितली लग्नाची Inside Story!
advertisement

मॅनेजर म्हणाले, "या अफवा जुन्या घटनांवर आधारित आहेत. आज या जोडप्यात कोणताही वाद नाही. घटस्फोटाच्या बातम्या निराधार आहेत." त्यांनी आणखीही सांगितले की, फेब्रुवारी 2024 मध्ये सुनीताने खटला दाखल केला होता, परंतु आता ते प्रकरण मिटले आहे.

गोविंदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनीता मरण्यासही होती तयार, म्हणाली, 'त्याला मुलगा..'

सुनीता आहुजाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, त्यांनी गोविंदाशीलग्न करण्याचा निर्णय फक्त धर्मेंद्रमुळे घेतला होता. सुनीता म्हणाल्या, "जेव्हा मी किशोरवयीन होते तेव्हा मला धर्मजी खूप आवडायचे. मला दुसरे कोणीही आवडत नव्हते. गोविंदा धर्मेंद्रसारखा दिसतो म्हणून मी त्याच्याशी लग्न केले."

advertisement

सुनीता यांनी हेही उघड केले की, एकदा तिने स्वतः धर्मेंद्रजींनाच हे सांगितले होते. याशिवाय, ‘सँडविच’ चित्रपटात गोविंदाने साकारलेली एक भूमिका धर्मेंद्रपासून प्रेरित होती, त्यावेळी त्यांना धर्मजींची आठवण झाली आणि त्यांनी गोविंदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुनीता आहुजा सध्या शाहरुख खानची चाहती आहे. त्यांनी शाहरुखला ‘सज्जन अभिनेता’ म्हटले आहे. तरीही धर्मेंद्र तिचा पहिला क्रश असल्याचे तिने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja: 'गोविंदाशी लग्न केलं कारण...' सुनीता आहुजांनी सांगितली लग्नाची Inside Story!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल