बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणची क्रेझ प्रचंड वाढली. जे त्याला नाव ठेवत होते ते त्याला त्याच्या घरी जाऊन भेटू लागले. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला मदत करत त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले. सूरजच्या नव्या घराचे कामही सुरू झाले. एकेकाळी मजुरी करून कष्टाचे दिवस पाहिलेला सूरज चव्हाण इतका पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर हवेत जाईल असं अनेकांना वाटलं होतं. पण मातीशी जोडलेली सूरज चव्हाणची नाळ तुटलेली नाही.
advertisement
( Suraj Chavan: 'मला तुला भेटायचं होतं...' सूरज चव्हाणला पाहून शाळकरी मुलीला अश्रू अनावर, पाहा Video )
सूरजकडे कितीही पैसा आला असला तरी त्याने त्याचे काम सोडलेले नाही. ज्या कामामुळे त्याचे दोन वेळेचे पोट भरले जात होतं ते मजुरीचे काम सूरज चव्हाणने पुन्हा सुरू केल्याचे दिसतंय. सूरज चव्हाणने त्याचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो सिमेंटच्या गोण्या उतरवताना दिसत आहे. एका ट्रकमधून सिमेंटच्या गोण्या काढून त्या दुसऱ्याच्या खांद्यावर देताना दिसतोय.
सूरज चव्हाणचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भावुक झालेत. सूरज चव्हाणवर प्रेम व्यक्त करत अनेकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलेय, "गरीबी अली तर लाजु नाही आणि श्रीमंती आली तर माजु नाही.कष्टाला पर्याय नाही. जमीनी वर पाय असलेला माणूस" दुसऱ्या युजरने लिहिलेय, "याला म्हणतात आपण किती पण फेमस झालो तरी आपण कधी बदलायच नाही." आणखी एका चाहत्याने लिहिलेय, "सुरज अडाणी असला तरी आज शिकलेल्या माणसांना त्याच्याकडून शिकायला भेटत आहे की जगावं कसं वागावं कसं" आणखी एका युझरने लिहिलंय, "त्याच्या नव्या घराचं काम सुरू आहे त्याचं सामान आणण्याचं काम करत असेल."