Suraj Chavan: 'मला तुला भेटायचं होतं...' सूरज चव्हाणला पाहून शाळकरी मुलीला अश्रू अनावर, पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Suraj Chavan : सूरज चव्हाण हे नाव आता सर्वांनाच माहीत झालंय. आपल्या गोलीगत पॅटर्न आणि झापूक झुपूक अंदाजाने सूरजने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली.
मुंबई : सूरज चव्हाण हे नाव आता सर्वांनाच माहीत झालंय. आपल्या गोलीगत पॅटर्न आणि झापूक झुपूक अंदाजाने सूरजने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. साधा भोळा स्वभाव आणि माणूसकीने त्याने बिग बॉस मराठी 5 सीझनची ट्रॉफी आपल्या नावे केली. बिग बॉसचा विनर बनल्यापासून त्याची लोकप्रियता खूपच वाढली आहे. त्याचा चाहतावर्गही वाढला आहे. त्याला भेटण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये सूरजला भेटल्यावर एक चिमुकली चाहती ढसाढसा रडायला लागली.
सूरज चव्हाणचा आणि त्याच्या एका छोट्या चाहतीचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचं सूरजविषयीचं निस्वार्थ प्रेम पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
VIDEO मध्ये नेमकं काय आहे?
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, सूरज चव्हाण त्याच्या एका शाळकरी चाहतीला भेटला आहे. सूरजला भेटून चाहती खूप रडत आहे. चाहती म्हणाली, ''मला तुला भेटायचं होतं. आज मी कुणाचं तरी स्टेटस पाहिलं. तू इथेच होतास. मी म्हटलं मलापण भेटायचंय. पण मला कुणीच येऊ दिलं नाही. माझी फ्रेंड म्हटली तू अजून इथेच आहेस.'' शाळकरी मुलीने रडरडत सूरज चव्हाणला मिठी मारली. हा इमोशनल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
advertisement
व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांच्या कमेंट आणि लाईक्स पाहायला मिळत आहेत. सूरजने त्याच्या इंस्टा अकाऊंटला हा व्हिडिओ शेअर करत 'फॅन्स लव्ह' असं कॅप्शन दिलं. सूरजचं लोक कौतुक करत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांची मने सूरजने जिंकली आहेत. त्यामुळे त्याला नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 1:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan: 'मला तुला भेटायचं होतं...' सूरज चव्हाणला पाहून शाळकरी मुलीला अश्रू अनावर, पाहा Video