स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी. आपल्या एकुलच्या एक मुलीच्या लग्नासाठी उदय टिकेकर आणि आरती टिकेकर प्रचंड खुश आणि उत्साही आहेत. लेकीची पाठवणी करण्याआधी तिच्याबरोबर सगळे क्षण ते आनंदानं एन्जॉय करताना दिसले.
हेही वाचा - मेहंदी सजली गं! स्वानंदीच्या हातावर रंगली आशिषच्या नावाची मेहंदी; 'आनंदी' जोडप्याचे फोटो समोर
advertisement
स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी एकत्र पार पडल्या. स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्यात घास बँड बाजा अरेंज करण्यात आला होता. मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात स्वानंदी मेहंदी काढायला बसली आहे आणि उदय टिकेकर आणि आरती टिकेकर आनंदात नाचताना दिसत आहेत. 60 वर्षांच्या आरती टिकेकर यांच्या चेहऱ्यावर लेकीच्या लग्नाची उत्सुकता आणि आनंद दिसून आला.
मेहंदी सोहळ्यानंतर रात्री स्वानंदी आणि आशिष यांचा संगीत सोहळा देखील झाला. संगीतमध्ये स्वानंदीचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेत. संगीतमध्ये दोघे रोमँटिक होताना देखील दिसले आहेत. अस्सल पारंपरिक पद्धतीनं दोघांच्या लग्नाचे सगळे विधी पार पडत आहेत.