TRENDING:

अखेर मुहूर्त ठरला! तेजश्री-सुबोधची 'वीण दोघांतली ही तुटेना' या दिवशी येणार भेटीला, पाहा काय आहे वेळ?

Last Updated:

Marathi TV show : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची बहुचर्चित मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' कधी सुरू होणार, याची तारीख आणि वेळ अखेर समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवर आता एक नवी आणि हटके प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जी नात्यांची नवी समीकरणं मांडणार आहे! तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची बहुचर्चित मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' कधी सुरू होणार, याची तारीख आणि वेळ अखेर समोर आली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, आणि तो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!
News18
News18
advertisement

दोन विरुद्ध स्वभाव, एक अनोखा विवाहबंध!

या मालिकेतील संकल्पनाच खूप वेगळी आणि आकर्षक आहे. यात दोन पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची पात्रं फक्त आणि फक्त त्यांच्या बहिण-भावाच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न करणार आहेत! प्रोमोमध्ये हेच दृश्य खूप प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. तेजश्री प्रधान 'स्वानंदी' या भूमिकेत दिसणार आहे, तर मराठी प्रेक्षकांचा लाडका सुबोध भावे 'समर'च्या भूमिकेत आपल्याला भेटणार आहे.

advertisement

Chandra Barot : अमिताभ बच्चनना 'डॉन' बनवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीवर शोककळा

स्वानंदी आणि समर यांच्या आवडीनिवडी, विचार अगदी विरुद्ध असले तरी, बहिण-भावांसाठी ते हे मोठं पाऊल उचलणार आहेत. त्यांच्या या अनोख्या नात्याची वीण कशी गुंफली जाते, आणि या दोन भिन्न व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी होतात, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

advertisement

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट 

या मालिकेत सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबतच राज मोरे, पूर्णिमा डे हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, किशोरी अंबिये, सुलभा आर्या, किशोर महाबोले यांसारखे अनुभवी आणि कसलेले कलाकारही यात दिसणार असल्याने प्रेक्षकांना अभिनयाची मेजवानी मिळणार आहे, हे निश्चित.

advertisement

'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका पाहता येणार आहे. त्यामुळे, आता तेजश्री आणि सुबोधच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री आणि या अनोख्या कथेचा अनुभव घेण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अखेर मुहूर्त ठरला! तेजश्री-सुबोधची 'वीण दोघांतली ही तुटेना' या दिवशी येणार भेटीला, पाहा काय आहे वेळ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल