Chandra Barot : अमिताभ बच्चनना 'डॉन' बनवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीवर शोककळा

Last Updated:

Chandra Barot Passes Away : चित्रपट दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी 'डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ते ८६ वर्षांचे होते.

News18
News18
मुंबई : 'अरे दीवानों मुझे पहचानो, कहा से आया मैं हूं कौन...' या गाण्याने आणि अमिताभ बच्चन यांच्या ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं, तो 'डॉन' चित्रपट. याच 'डॉन'चे शिल्पकार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्र बरोट यांचं आज रविवार, २० जुलै २०२५ रोजी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

सात वर्षांपासून फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज!

चंद्र बरोट यांच्या पत्नी, दीपा बरोट यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, चंद्र बरोट गेल्या सात वर्षांपासून फुफ्फुसांच्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर गुरु नानक रुग्णालयात डॉ. मनीष शेट्टी यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या लढ्यातून अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement

मैत्रीसाठी उचललेलं 'डॉन'चं शिवधनुष्य!

जवळचे मित्र आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर-निर्माते नरिमन इराणी यांना पाठिंबा देण्यासाठी चंद्र बरोट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. नरिमन इराणी आर्थिक संकटात असताना, त्यांना मदत करण्यासाठी चंद्र बरोट यांनी 'डॉन' चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी उचलली. 'डॉन' हा चित्रपट फक्त एक ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर तो चंद्र बरोट यांच्यासाठी एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन'सोबतच 'डॉन' अशीही ओळख दिली.
advertisement

टांझानिया ते बॉलिवूडचा प्रवास!

चंद्र बरोट यांचा जीवनप्रवासही खूप रंजक होता. टांझानियामध्ये वंशिक अशांतता वाढल्याने ते पुन्हा भारतात परतले. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता-चित्रपट निर्माता मनोज कुमार यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. मनोज कुमार यांच्यासोबत काम करताना त्यांनी चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकले आणि त्यानंतर त्यांनी 'डॉन' सारखा अजरामर चित्रपट दिला.
advertisement
चंद्र बरोट यांनी आपल्या दिग्दर्शनाने 'डॉन'च्या रूपाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक अनमोल भेट दिली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक महान दिग्दर्शक गमावला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chandra Barot : अमिताभ बच्चनना 'डॉन' बनवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीवर शोककळा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement