TRENDING:

Tejashree Pradhan : गोरेगावात राहणारी तेजश्री ठाण्याला का शिफ्ट झाली? अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांना सांगितलं मनातलं दु:ख

Last Updated:

तेजश्रीने एक मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामागे एक मोठं कारण आहे आणि त्याबद्दल तिने थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न उपस्थीत केला. एका मोठ्या निर्णयाची तो म्हणजे तिचं मुंबईतील गोरेगाव सोडून ठाण्यात शिफ्ट होणं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तेजश्री सध्या तिच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये व्यस्त आहे. तिने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि त्यातच तिने तिच्या पर्सनल आयुष्याबद्दलचा खुलासा केला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना प्रश्न देखील विचारला.
तेजश्री प्रधान
तेजश्री प्रधान
advertisement

तेजश्रीने एक मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामागे एक मोठं कारण आहे आणि त्याबद्दल तिने थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न उपस्थीत केला. एका मोठ्या निर्णयाची तो म्हणजे तिचं मुंबईतील गोरेगाव सोडून ठाण्यात शिफ्ट होणं.

आता तुम्ही म्हणाल की मुंबईत सर्व सोयी असताना तेजश्री अचानक ठाण्याला का गेली? या प्रश्नाचे उत्तर खुद्द तेजश्रीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या एका विशेष संवादादरम्यान दिले आहे.

advertisement

नेमकं कारण काय?

तेजश्री सध्या ज्या मालिकेचे शुटिंग करत आहे, त्याचे सेट ठाणे परिसरात आहेत. पण केवळ शुटिंग हेच एक कारण नाही. तेजश्रीने मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, जो प्रत्येक ठाणेकर रोज अनुभवतो, तो म्हणजे 'वाहतूक कोंडी' (Traffic Jam).

तेजश्रीने सांगितले की, गोरेगाववरून ठाण्याला प्रवासासाठी खूप वेळ लागतो. मुंबई-ठाणे प्रवासादरम्यान होणारी ट्रॅफिकची समस्या ही कलाकारांसाठीच नाही, तर सर्वसामान्यांसाठीही डोकेदुखी ठरते. शुटिंगचे तास आधीच ठरलेले असतात, त्यात प्रवासाचे 3-4 तास वाया जाणे ही मोठी अडचण होती. त्यामुळे आपला वेळ वाचवण्यासाठी आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला.

advertisement

तेजश्रीने जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारलं की, "ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तुम्ही काही प्लॅनिंग केलंय का?" तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, ठाणे आणि एमएमआर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे, हे सरकारला ठाऊक आहे. मात्र, त्यावर उपाय म्हणून आता ठाण्यात मेट्रो सुरू झाली आहे आणि पुढे देखील यावर काम सुरु राहिल आणि वेगवेगळे भाग जोडले जातील.

advertisement

मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांचा भार कमी होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात रस्ते रुंदीकरण आणि नवीन फ्लायओव्हर्समुळे हा प्रवास अधिक सुखकर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आदितीची कमाल, गॅस सिलेंडरच्या मदतीने बनवला हिटर, शुन्य येतंय वीजबिल
सर्व पहा

वाहतूक कोंडी ही आजच्या शहरी जीवनातील मोठी समस्या आहे. तेजश्रीसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीलाही या समस्येमुळे आपलं घर बदलावं लागलं, हे वास्तव विचार करायला लावणारं आहे. मात्र, मेट्रोच्या सुविधेमुळे आता तेजश्री आणि इतर ठाणेकरांचा प्रवास सुसह्य होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejashree Pradhan : गोरेगावात राहणारी तेजश्री ठाण्याला का शिफ्ट झाली? अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांना सांगितलं मनातलं दु:ख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल