‘माझ्या संवैधानिक हक्काचं रक्षण करा!’
पल्लवी जोशींनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलं आहे की, “मी ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाची निर्माती आहे आणि मला खूप दुःख होत आहे की, राजकीय दबावामुळे माझ्या चित्रपटाला बंगालमध्ये प्रदर्शित होण्यापासून रोखलं जात आहे.”
advertisement
त्यांनी पुढे राष्ट्रपतींना विनंती केली की, “मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही यात हस्तक्षेप करून माझ्या संवैधानिक हक्कांचं रक्षण करा आणि बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल, याची खात्री करा.” त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे.
ट्रेलर रिलीजच्या वेळीही झाला होता बवाल!
‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर रिलीजच्या वेळीही मोठा वाद झाला होता. कोलकातामध्ये ट्रेलर रिलीजचा कार्यक्रम आयोजित केला होता, पण तिथे विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. तरीही ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. विवेक अग्निहोत्री यांनीही या घटनेचा निषेध केला होता.
आता त्यांची पत्नी आणि चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशींनीही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी राष्ट्रपतींना आपली शेवटची आशा मानलं आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, शाश्वत चटर्जी यांसारखे मोठे कलाकार आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.