चौथ्यांदा बोहल्यावर चढणार टॉम क्रूझ
अभिनेता टॉम क्रूज सध्या आपल्या चौथ्या लग्नाबाबत चांगलाच चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॉम क्रूज वयाच्या 63 व्या वर्षी गर्लफ्रेंड एना डे अरमानसोबत संसार थाटण्याच्या तयारीत आहे. रडार ऑनलाइनच्या माहितीनुसार, टॉम आणि एनाला आपलं लग्न 'मिशन इम्पॉसिबल'मधील स्टंटसारखं करायचं आहे. त्यामुळे हे जोडपं पाण्याखाली किंवा थेट अंतराळात लग्न करण्याचा विचार करत असल्याचं आता समोर आलं आहे.
advertisement
जगणं कठीण... कोरोनासह 3 गंभीर आजारांनी ग्रासलं, ICUमध्ये जाण्याची वेळ; 4 वर्षांपासून अभिनेत्री देतेय झुंज
स्कायडायव्हिंगदरम्यान हवेतच घेणार सात फेरे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,टॉम क्रूझ आणि एना या दोघांनाही धोकादायक आणि थरारक गोष्टी करण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यातही रोमांचाची झलक पाहायला मिळणार आहे. स्कायडायव्हिंगदरम्यान हवेतच ते एकमेकांना वचन देण्याचीही चर्चा सुरू आहे. अभिनेता टॉम क्रूजचं चौथं लग्न पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील.
टॉम क्रूझची तीन लग्न
63 वर्षीय टॉम क्रूझची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. मिमी रॉजर्स, निकोल किडमॅन आणि केटी होम्स या तिघींसोबत त्याने लग्न केलं होतं. पण तिघींसोबत त्याचा घटस्फोट झाला होता. आता त्याच्या चौथ्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.