जगणं कठीण... कोरोनासह 3 गंभीर आजारांनी ग्रासलं, ICUमध्ये जाण्याची वेळ; 4 वर्षांपासून अभिनेत्री देतेय झुंज

Last Updated:

प्रसिद्ध अभिनेत्रीनं काम सोडलं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीचे रुग्णालयातील फोटो समोर आला आहे. 

News18
News18
मुंबई : असं म्हणतात एकदा आजारपण जडलं की त्यापासून आपली सुटका करणं कठीण असतं. अनेकांची इच्छाशक्ती त्यांना त्यातून बाहेर काढते पण अनेकजण त्या आजारात अनेक वर्ष खितपत पडतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर असंच काहीस घडलं आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मागील चार वर्षांपासून आजारी आहे. तिने काम सोडलं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीचे रुग्णालयातील फोटो समोर आला आहे.
साउथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत त्यातील एक नाव म्हणजे मलयाळम फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना देवी चंदना. अभिनेत्री गेली 4 वर्षं आजारी आहे. एकामागून एक तीन गंभीर आजारांनी तिला ग्रासलं आहे. तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे.
advertisement

चार वर्षांत तीन आजारांचा सामना

2021 मध्ये देवी चंदना हिला कोरोना झाला. या आजारातून बाहेर पडताच अवघ्या सहा महिन्यांत ती पुन्हा आजारी पडली. तिला H1N1 झाला. मात्र संकट इथेच थांबलं नाही. काही काळानंतर त्यांना Hepatitis A ची लागण झाली. या सलग आलेल्या आजारांमुळे त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि ICU पर्यंत उपचार घ्यावे लागले.
advertisement

सिनेसृष्टीतील प्रवास

43 वर्षीय देवी चंदना यांना प्रेक्षकांनी 'पूर्णमिथिंकल' आणि 'वसंतमालिका' या मालिकांमधून ओळख मिळवली. तर मोठ्या पडद्यावर त्यांनी 'नरीमन', 'ब्रह्मास्त्रम', 'थँक यू' यांसारख्या चित्रपटांत अभिनय केला आहे. अभिनयासोबतच त्या एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर आहेत. भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, वुट्टम तुल्ला आणि कथकली या नृत्यप्रकारांत त्यांनी आपली कला सादर करून देशभरात प्रसिद्धी मिळवली.
advertisement
आपल्या व्लॉगमधून देवी चंदना यांनी त्यांच्या आजारपणाविषयी स्वतः माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं की, ओणमच्या दिवशी अचानक प्रकृती खालावली आणि तपासणीत त्यांना Hepatitis A असल्याचं समजलं. त्यावेळी त्यांना तब्बल 1 आठवडा रुग्णालयात राहावं लागलं होतं. या काळात त्या ना बोलू शकत होत्या, नीट चालूही शकत नव्हत्या.

डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

advertisement
देवी चंदना यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या पतींनी सांगितलं की, त्यांचा बिलीरुबिन लेव्हल फक्त 18 इतका खाली आला होता आणि लिव्हर एंजाइम 6000 पेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना लांब काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नारळ, तेल आणि मीठ यांचे सेवन टाळण्यासही सांगितले आहे.

अभिनेत्रीचा संघर्ष

देवी चंदना यांनी एकदा सांगितलं होतं की, "मला जेव्हा Covid झाला तेव्हा वाटलं होतं की आता यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही. पण काही महिन्यांतच H1N1 आणि त्यानंतर Hepatitis A झाला. हा काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एखाद्या युद्धासारखा होता."
मराठी बातम्या/मनोरंजन/
जगणं कठीण... कोरोनासह 3 गंभीर आजारांनी ग्रासलं, ICUमध्ये जाण्याची वेळ; 4 वर्षांपासून अभिनेत्री देतेय झुंज
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement