अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांनी सात फेरे घेतले असून, इंटरनेटवर आलेल्या व्हिडिओंमध्ये अविका आपला मांग टिका बाजूला सारून, कपाळावरचं सिंदूर आनंदाने दाखवताना दिसत आहे. ११ ऑक्टोबरला या लग्नाचं टेलिकास्ट कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर होणार आहे.
advertisement
अविकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं लहानपणीचं स्वप्न होतं की, तिचं लग्न एकतर सगळ्या जगाने पाहावं, किंवा मग तिने गुपचूप कोर्ट मॅरेज करावं. तिची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. मिलिंद अविकापेक्षा ६ वर्षांनी मोठा आहे.
चाहत्यांनी शुभेच्छासोबत मारले टोमणे
लग्नानंतर अविका आणि मिलिंदने पापाराझींची भेट घेऊन त्यांना मिठाई वाटली. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप डान्स केला. सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा मिळत असल्या, तरी काही लोकांनी या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युजरने कमेंट केली, “लग्न केलं आहे, तर ते निभवा! घटस्फोट घेऊन नाव खराब करू नका!” तर दुसऱ्याने, “हे फक्त शोसाठी नाटक आहे” असं म्हणून टोमणा मारला.
यापूर्वी अविकाचं नाव तिचा सह-अभिनेता मनीष रायसिंघनसोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्याबद्दल अशाही अफवा पसरल्या होत्या की त्यांचं एक सीक्रेट बाळही आहे, पण अविकाने नंतर स्पष्ट केलं होतं की, मनीष तिच्या वडिलांच्या वयाचा आहे.
टीव्हीवर याआधीही अनेक कलाकारांची लग्नं झाली, पण ती फार यशस्वी झाली नाहीत. त्यामुळे अविका-मिलिंदचं हे नातं किती टिकतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.