ऋषी कपूर हे बॉलिवूडमधील अशा स्टार्सपैकी एक होते जे त्यांच्या मूडीपणासाठी ओळखले जात होते. त्यांना कधी कोणाचा राग येईल हे सांगणं कठीण होतं. ते प्रचंड मूडी असूनही एक उत्तम विनोदी कलाकारही होते. काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शोमध्ये दिसलेल्या वरुण धवनने त्यांच्या पहिल्या चित्रपट "स्टुडंट ऑफ द इयर" मधील एक मजेदार गोष्ट शेअर केली.
advertisement
'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सेटवरचा किस्सा
वरुण धवनने खुलासा केला की, एका फुटबॉल सीनच्या शूटिंग दरम्यान ऋषी कपूरला त्याच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या केसांमधील जेलची समस्या होती. वरुण हसला आणि म्हणाला, "ऋषीजी म्हणाले, 'हे काय आहे? तुमचे केस अजिबात हलत नाहीत. वारा असो किंवा वादळ तुमचे केस एक इंचही हलत नाहीत. तुम्ही फुटबॉल खेळत आहात तुमचे केस हलले पाहिजेत."
वरुणने पुढे म्हणाला, ऋषी कपूर त्याच्याकडे आले आणि त्याच्या केसांना स्पर्श केला. त्यानंतर त्याने दिग्दर्शक करण जोहरला फोन करून तक्रार केली. करणने वरुणला आदेश दिला, "त्याचे केस हलवा." पण वरुणने उत्तर दिले, "करण, माझे केस जेलने कव्हर केलेत ते हलवता येणार नाहीत" ऋषी कपूर रागावले आणि म्हणाले, "हे जेल काढा, मी शॉट देणार नाही." जेल काढल्याशिवाय पुढचा शॉट झाला नाही. वरुणचा हा किस्सा ऐकून सगळेच हसले.
राहा म्हणजे मिनी ऋषी कपूर
ऋषी कपूरची सून होण्यापूर्वी, आलिया भट्टने त्यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. "स्टुडंट ऑफ द इयर" नंतर, त्यांनी 2016 मध्ये "कपूर अँड सन्स" मध्ये एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, आलियाने त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. हा तो काळ होता जेव्हा ती रणबीर कपूरला डेट करत नव्हती परंतु ती दररोज संध्याकाळी ऋषी कपूरसोबत मजेदार क्षण घालवत असे, गोष्टी ऐकायची आणि त्यांच्याबरोबर जेवण करायची.
आलिया म्हणाली, "ऋषीजींकडे सांगण्यासाठी खूप छान गोष्टी होत्या." शूटिंगनंतर ते सर्वांना एकत्र जेवणासाठी बोलवायचे. तो खूप छान माहोल होता. मला त्यांची खूप आठवण येते." आलियाने असेही उघड केले की तिची मुलगी राहामध्ये ऋषी कपूरची झलक दिसते. ती म्हणाली, "जेव्हा लोक राहाला पाहतात तेव्हा ते म्हणतात की ती एक मिनी ऋषी कपूर आणि आलिया भट्ट आहे. तिच्यात ऋषीजींची थोडीशी झलक आहे, जी वेळोवेळी दिसून येते."
ऋषी कपूर आणि डिंपल कापाडिया यांचा किस्सा
शो होस्ट ट्विंकल खन्नानेही ऋषी कपूरशी संबंधित एक मजेदार घटना शेअर केली. तिने सांगितले की, ऋषी कपूरने एकदा तिच्या (ट्विंकलच्या) वाढदिवशी ट्विट केले होते, "जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतीस, तेव्हा मी तिच्यासाठी गाणी गायली होती." या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि लोक तिला ऋषी कपूरची "नाजायज मुलगी" मानू लागले. ट्विंकल हसली आणि म्हणाली, "त्यानंतर, ऋषीजींना ट्रोल करण्यात आले आणि त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले"
ट्विंकलचे विधान ऐकून आलिया आश्चर्यचकित झाली. आलियाची अस्वस्थता पाहून काजोलने विनोद करत म्हणाली, "आलियाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पहा." ट्विंकलने लगेच उत्तर दिलं, "मी तुझी वहिनी नाही. हा एक गैरसमज होता." ऋषी कपूर आणि ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये राज कपूरच्या "बॉबी" चित्रपटातून एकत्र पदार्पण केलं होतं.