उन्नावच्या गंगाघाट परिसरातील सरस्वती टॉकीजला आग लागली आहे. मंगळवारी सकाळी 10:45 वाजता ही भीषण आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण थिएटरमध्ये पसरली. शो सुरू होण्याआधीच ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. थिएटरमध्ये काम करणारे पाच कर्मचारी अडकले होते मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं आहे.
( सिंगापूरला गेला, भारतात येताच 'स्टुडेन्ट ऑफ द इअर' फेम अभिनेत्याला अटक; पण का? )
advertisement
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण तोपर्यंत थिएटरमधील स्क्रीन, खुर्च्या आणि हॉलमधील सर्व भाग जळून खाक झाला होता. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संपूर्ण थिएटर जळून खाक झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
साऊथ सिनेमाचा शोला लागलेला
आगी लागली तेव्हा थिएटरमध्ये मराई हा साऊथ इंडियन सिनेमाचा शो लागला होता. मात्र शो सुरू होण्याआधीच भीषण आग लागली. शो सुरू होण्यापूर्वीच आग लागल्याने प्रेक्षक हॉलमध्ये नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी आग लागण्यामागील कारणांचा तपास सुरू केला आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
'मिराई' हा पौराणिक ड्रामा असलेला साऊथ सिनेमा आहे. तेजा सज्जा, मंचू मनोज, रितिका नायक, श्रिया सरन हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.