हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्येची अनोखी केमिस्ट्री
सध्याच्या तरुण पिढीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि आपल्या खास, विनोदी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता सारंग साठ्ये हे या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. हृता आणि सारंगची ही अनोखी केमिस्ट्री पडद्यावर काय कमाल करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.
advertisement
या फ्रेश जोडीला घेऊन येण्याचं श्रेय दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांना जातं. यापूर्वी आनंद गोखले यांनीच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानची जोडी ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली होती.
मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच दिसणार नवी जोडी
दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी यावेळी आपला उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी एक अत्यंत मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत. सध्या चित्रपटाच्या कथेबद्दल जास्त बोलता येणार नाही, पण इतकं नक्की की हृता आणि सारंगच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, याची मला खात्री आहे.”
फाईन ब्रू प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि ट्रू होप फिल्म वर्क्सच्या सहयोगाने हा चित्रपट येत आहे. याचं लेखन आणि दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनीच केलं आहे. ईशा मूठे, श्रुती साठे आणि जयकुमार मुनोत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘शहाणी’ हृता आणि सारंगची ही नवी जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.