लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नीलम अनेक गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, "राजकारण्याची पत्नी हे टाइटल खूप मोठं आहे. ते राजयकीय नेते आहेत. पण ते छान रसिक आहे. व्यक्ती म्हणून वेगळे आहेत. प्रत्येक फिल्डमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. ते जरी एका पक्षात काम करत असतील तर त्याचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. सगळ्यांबरोबर मित्र टिकवणं त्यांची मैत्री ही खरी मैत्री आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. या सगळ्यात मी सहचारिणी म्हणून मदत पूर्ण होते. बॅक बोन, बायको म्हणून खंबीर आधार आम्ही एकमेकांना देतो. पण आम्ही एकत्र व्यासपीठ शेअर करत नाही. कारण मला राजकारणात मला फारसा रस नाही."
advertisement
( वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक? मुख्य भूमिकेत कोण? अभिनेत्रीने थेट नावच सांगितलं )
करिअर यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयावर नीलम म्हणाली, "माझ्या फिल्डपासून वीआरएस घ्यायची हा माझा वैयक्तिक निर्णय होता. नवऱ्याचं करिअर, तो राजकारणात आहे म्हणून अभिनयात कसं काम करायचं असं काहीच नव्हतं. तो निर्णय माझा होता. टॉपला जाऊन थांबायचं हे मी ठरवलं. तो निर्णय खूप कठीण होता. त्यातून बाहेर येणंही कठीण होतं. त्याही निर्णयात त्यांनी मला खूप छान साथ दिली. त्या फेजमधून जाताना मला अनेकदा वाटायचं की मी चूक केली का, मला पुन्हा जायला हवं. पण नाही मला जे काही करायचं होतं त्यात मी स्वत:ला खूप छान सामावून घेतलं.
नीलम पुढे म्हणाली, "माझ्या पतीने माझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला. त्यांनी मला फ्रिडम दिलेलं आहे. आम्ही आजची स्पेस उगाचच मोडत नाही. व्यक्ती म्हणून त्यांनी मला माझी स्पेस दिली आहे. तू सो सो एक्ट्रेस आहेस तर पुन्हा एकदा प्रयत्न करत अशी म्हणायची गरजच भासली नाही. पहिल्या इतक्या नाही पण छान छान प्रोजेक्टच्या ऑफर्स येतात पण मी माझ्या आयुष्यात बिझी आहे. मला जे करायचं होतं ते मी करते. मला समाजिक कार्यची आवड आहे. मला फिरायची आवड आहे. मी खूप फोटोग्राफ्स काढते."