'वस्त्रहरण'नं वाढवली मालवणी भाषेची प्रतिष्ठा
गंगाराम गवाणकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे तीन मुलगे, सुना आणि नातवंडं असं कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाची मोठी हानी झाली आहे.
( जेवण करताना अचानक बेशुद्ध पडले सतीश शाह, सचिन पिळगांवकर नाही तर या व्यक्तीशी झालेलं शेवटचं बोलणं )
'वस्त्रहरण' हे गंगाराम गव्हाणकर यांचं सर्वात गाजलेलं नाटक. या नाटकानं मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेला नवं स्थान मिळवून दिलं. या नाटकाचे तब्बल 5,000 पेक्षा जास्त प्रयोग झाले दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये या नाटकाचा प्रयोग झाला होता. गंगाराम गव्हाणकर यांनी लिहिलेल्या याच नाटकातून मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट उदयास आला.
advertisement
1971 साली गंगाराम गवाणकर यांनी बॅकस्टेजपासून आपला रंगभूमीवर प्रवास सुरू केला होता. त्या काळात ते MTNL मध्ये नोकरी करत होते. पण अभिनयाशी जोडलेली नाळ त्यांना रंगभूमीकडे घेऊन आली.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पोस्ट शेअर करत गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "गवाणकर यांनी मालवणी बोलीला रंगभूमीवर मान मिळवून दिला. आम्ही मालवणी मुलुखातील एक प्रतिभावान लेखक गमावला."
