बोटात दिसली 'ती' अंगठी!
दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या रश्मिका मंदानाने एक अंगठी घातली होती, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही अंगठी तिने तिच्या डाव्या हाताच्या बोटात घातली होती, जिथे साखरपुड्याची अंगठी घातली जाते. ऑनलाइन व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये तिच्या बोटात ही अंगठी स्पष्ट दिसत आहे.
यामुळेच, रश्मिकाने गुपचूप साखरपुडा केला की काय, असा अंदाज लावला जात आहे. तिचं नाव गेल्या काही वर्षांपासून अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडलं जात आहे. आता या अंगठीमुळे या सेलिब्रिटी कपलने त्यांच्या नात्यात पुढचं पाऊल उचललं आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, रश्मिका तिच्या स्टेटमेंट ज्वेलरीसाठी ओळखली जाते, पण यावेळी तिने एक साधी बँड पद्धतीची अंगठी घातली होती.
advertisement
न्यू यॉर्कपासून दुबईपर्यंतच्या भेटीगाठी!
रश्मिका आणि विजय एकत्र अनेकदा दिसले आहेत. गेल्या महिन्यात ते दोघे न्यू यॉर्कमध्ये 'इंडिया डे परेड'मध्ये एकत्र सहभागी झाले होते. त्याआधीही त्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्रिप्स आणि रोमँटिक हॉलिडेजचे फोटो व्हायरल झाले आहेत. या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या अफेअरबद्दल कधीही काहीही स्पष्ट सांगितलं नसलं, तरी त्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठींनी या चर्चांना हवा दिली आहे.
या जोडीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, हे दोघे लवकरच एका पीरियड ड्रामा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, असं बोललं जात आहे. या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नसल्याने सध्या त्याला 'VD14' असं तात्पुरतं नाव देण्यात आलं आहे.