21 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन्स
1988 साली रिलीज झालेला हा चित्रपट म्हणजेच दयावान. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यात प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या वयात खूप फरक होता. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना 42 वर्षांचे होते आणि माधुरी फक्त 21 वर्षांची होती. संपूर्ण सिनेमात दोघांवर अनेक इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले होते.
advertisement
सिनेमातील रोमँटिक गाणं
त्या वेळी विनोद खन्ना यांचा दयावान हा त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. विशेषतः चित्रपटातील एक गाणे, रोमँटिक सीन्स, पंकज उधास यांचा हार्ट टचिंग आवाज या सगळ्यामुळे हे गाणं 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक गाणं बनलं. आज फिर तुमपे प्यार आया है, हे ते गाणं होतं जे खूप फेमस झालं.
https://youtu.be/VD-C8eBP70M?si=x6coek5gj1vxwzgs
या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरीचे असे अनेक सीन्स होते जे थिएटरमध्ये पाहून प्रेक्षक अवाक् झाले. माधुरी दीक्षित अजूनही या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप वाटतो. चित्रपटातील एका सीनमध्ये विनोद खन्ना माधुरीसोबत आऊट ऑफ कंट्रोल झाले होते. या सीन्सवरून बराच वाद झाला. माधुरीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की मी त्या सीन्सबाबत घाईघाईने निर्णय घेतला. त्यावेळी मी नकार देण्याइतपत शहाणी नव्हतो. नंतर मला वाटले की मी तो सीन करायला नको होता.