TRENDING:

Vivek Agnihotri: कधीच बॅकफूटवर न जाणारा शेवटी मराठीसमोर नमला, 'गरीबो का खाना' वर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण

Last Updated:

Vivek Agnihotri: बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या ठाम आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अलीकडेच ते एका विधानामुळे मोठ्या वादात अडकले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या ठाम आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अलीकडेच ते एका विधानामुळे मोठ्या वादात अडकले होते. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये मराठी जेवणाला “गरिबांचं जेवण” म्हटलं होतं. सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा रंगली आणि नेहा शितोळे, महेश टिळेकर यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्यावर टीका केली. मात्र आता विवेक अग्निहोत्रींनी या वादावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
 विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री
advertisement

"मी तेव्हा मजेत बोललो होतो"

‘The Raunac Podcast’ ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “Curly Tales चं पॉडकास्ट करताना मी मजामस्करीत असं म्हटलं होतं की, लग्नानंतर पल्लवी जोशी मला वरण-भात खायला द्यायची. त्या वेळी मला दिल्लीकर असल्यामुळे झणझणीत खाण्याची सवय होती. म्हणून मी हसत-हसत म्हटलं की, ‘हे काय गरिबांचं जेवण आहे, यात तर मीठही नाही.’ पण त्यानंतर मी लगेचच सांगितलं होतं की भारतातलं सर्वात हेल्दी जेवण म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण आहे.”

advertisement

'ये तो गरिबोंका खाना', मराठी जेवणाला विवेक अग्निहोत्रीने नावं ठेवली! Video

त्यांनी पुढे सांगितलं की, आज वरण-भात हेच त्यांचं आवडतं जेवण आहे आणि ते जवळपास रोज खातात. “मोठं झाल्यावर अक्कल आल्यावर समजलं की वरण-भातासारखं पौष्टिक जेवण दुसरं नाही,”

“माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला”

विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की, काही लोकांनी त्यांचं पहिलं वाक्य एडिट करून वेगळ्या पद्धतीनं पसरवलं. त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण झाला. “आजकाल अनेकदा कुठलंही वाक्य संदर्भाशिवाय पसरवलं जातं आणि त्याचा गैरसमज होतो. मी मराठी जेवणाची खिल्ली कधीच उडवली नाही, उलट ते मला खूप आवडतं,”

advertisement

वाद वाढल्यानंतर अग्निहोत्रींनी मराठी प्रेक्षकांना आश्वस्त केलं. “मी स्वतः आता महाराष्ट्रीयन पदार्थांवर प्रेम करतो. पिठलं-भाकरी, आमटी-भात हे मला खूप आवडतं. पल्लवीमुळे मला या जेवणाची खरी चव कळली. त्यामुळे कोणालाही गैरसमज व्हायला नको,” असं ते म्हणाले.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Vivek Agnihotri: कधीच बॅकफूटवर न जाणारा शेवटी मराठीसमोर नमला, 'गरीबो का खाना' वर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल