शिरीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, " बेबी बॉय, अलहमदुलिल्लाह या सुंदर भेटवस्तूबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आमच्या हृदयांना एक नवीन प्रेम मिळालं आहे. या नवीन प्रवासात आमच्या मुलासाठी प्रार्थना करा."
"मला मारायची, अत्याचार करायची", प्रसिद्ध अभिनेत्रीचा आईकडूनच छळ, प्रियकरानेही दिला धोका
व्हिडिओमध्ये या नव्या प्रवासाबद्दलचे त्यांच्या दोघांचे भावनिक क्षण दिसून येतात. त्यांच्या या आनंदात चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. रश्मी देसाई, कृष्णा मुखर्जी, अशिता धवन यांसारख्या अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांनी शिरीनला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा मुखर्जीने लिहिलं, "नवीन पालकांना खूप खूप शुभेच्छा!"
advertisement
शिरीनने 2025च्या एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने आणि हसनने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, "अल्लाहने आमच्या प्रार्थना ऐकल्या. एक छोटासा आत्मा, जो अर्धा त्याचा, अर्धा माझा आहे..."
शिरीनने 2021 मध्ये हसन सरताजसोबत जयपूरमध्ये थाटात लग्न केलं होतं. दिव्यांका त्रिपाठी, अली गोनी, कृष्णा मुखर्जी यांसारख्या स्टार्सनी त्या लग्नाला हजेरी लावली होती.