या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. श्यामकानू महंत: नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक, यांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. सिद्धार्थ शर्मा: झुबिन गर्गचे मॅनेजर, यांना गुजरात-राजस्थान सीमेवरून पकडण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मोलकरणीचा छळ, विवस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल
दोघांनाही हातकड्या घालून कडक सुरक्षेत विमानाने आसाममध्ये आणण्यात आले आणि थेट सीजेएम न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
advertisement
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, झुबिनच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल फोन सिद्धार्थ शर्माकडे होता. हा फोन आणि इतर जप्त केलेल्या वस्तूंमध्ये चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांच्या मते, हे पुरावे संपूर्ण प्रकरणाला नवा मोड देऊ शकतात. सीआयडीने दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या 12 गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यात फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, कटकारस्थान अशा गंभीर आरोपांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, झुबिन गर्ग हे ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक होते. त्यांच्या अचानक आणि गूढ मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात धक्का बसला होता. आता या तपासातील नव्या घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि संताप अधिकच वाढला आहे.