या घटनेच्या निषेधार्थ खासदार फर्नांडिस यांनी अंजुना इथे कँडल मार्च देखील काढला होता. इतकच नाही तर सरकारवर त्यांनी या कँडल मार्चमधून निशाणा साधला होता. नोकर भरतीसाठी नोकर भरतीसाठी कोणाला पैसे द्यावे लागतात हे संपूर्ण गोव्याला माहिती आहे. असं असलं तरी पोलिसांनी कारवाई करावी असं सांगण्याचं धाडस मुख्यमंत्री करत नाही असे गंभीर आरोपही विरोधकांनी त्यांच्यावर लावले आहेत.
advertisement
पोलिसांची पदं भरण्यासाठी किती पैसे घेतले जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं रोखता आलं असतं पण तशी नैतिकता दाखवली नाही. आम्ही त्याविरोधी लढणार या सगळ्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप असा गंभीर आरोप काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.
गोव्यात नोकरीसाठी पैसे भरावे लागत असल्याच्या उदाहरणांचे दाखले देऊन पुन्हा एकदा काँग्रेसनं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यात ड्रग्स, निनावी भूखंड, सनबर्न फेस्टिवल आणि आता नोकरीत लाच असे अनेक मुद्दे प्रमोद सावंत यांना आगामी निवडणुकीसाठी अडचणीत आणणार का? हे पाहावं लागणार आहे. याबाबत सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.