भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, मात्र भेसळीमुळे बाजारात शुद्ध तूप मिळणे कठीण झाले आहे. बनावट तूप खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे घरी तुपाची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. आज आपण काही जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुपाची शुद्धता तपासू शकता.
advertisement
हाताच्या तळव्यावर एक चमचा तूप लावा. जर तूप काही मिनिटांत वितळले तर ते शुद्ध आहे. शरीरातील उष्णतेमुळे शुद्ध तूप लवकर वितळते, तर नकली तूप वितळण्यास जास्त वेळ लागतो.
advertisement
अर्धा चमचा तुपात आयोडीनचे काही थेंब मिसळा. जर रंग निळा किंवा काळा झाला तर तूपात स्टार्च मिसले गेले आहे.
advertisement
एक चमचा तूप गरम करा. जर तूप लगेच वितळले आणि सोनेरी रंगाचे झाले तर ते शुद्ध आहे. नकली तूप सहसा पांढरा चिकट होते.
advertisement
शुद्ध तुपाला एक विशिष्ट सुगंध असतो, तर भेसळयुक्त तुपात नसतो. शुद्ध तुपाचा सुगंध ताजा असतो.
एका भांड्यात तूप टाका आणि 30 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंड केल्यानंतरही शुद्ध तूप एकसमान घनरूपच राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2024 5:55 PM IST