त्वचेवर येतात कोड
आयुर्वेदात दुधाशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी, विशेषतः दुधासोबत सेवन करण्यास मनाई आहे. यापैकीच एक म्हणजे दूध आणि माशांचे मिश्रण. असं म्हटलं जातं की, दूध आणि मासे खाल्ल्याने पांढरे डाग येऊ शकतात. या आजाराला 'कोड' (Vitiligo) असंही म्हणतात. दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो.
advertisement
पचनाचा होतो प्रचंड त्रास
आयुर्वेदिक डॉक्टर प्रशांत गोगोई यांनी सांगितलं की, दूध आणि माशांचे एकत्र सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. दूध माशांसोबत कधीही खाऊ नये. दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत. ते एकत्र खाल्ल्याने अनेक रोग होऊ शकतात. मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने पांढऱ्या डागांचा धोका वाढतो. दुसरीकडे, माशांसोबत दूध खाल्ल्याने पचनाचे त्रास होण्याची शक्यता नक्कीच असते. विशेषतः, माशांचा प्रभाव खूप गरम मानला जातो आणि दुधाचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे, दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरातील तमो गुणधर्म वाढतात.
हे आजार होण्याची शक्यता असते
यामुळे शरीरात रासायनिक बदल होतात. म्हणूनच दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या पिगमेंटेशनचा (skin pigmentation) धोका वाढू शकतो, तर ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची अन्न ऍलर्जी (food allergies) आहे, त्यांनी या दोन वस्तू एकत्र खाणे टाळावे. मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने त्वचेला खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. याव्यतिरिक्त, मासे आणि दूध दोघांचेही वेगवेगळे प्रभाव असल्याने सर्दीचा धोका असतो.
हे ही वाचा : वजन कमी करायचंय? टेन्शन नका घेऊ, फक्त 'या' 8 गोष्टी लक्षात ठेवा, लगेच दिसेल फरक
हे ही वाचा : जास्त खाणं पडेल महागात! किचनमधील या 3 वस्तू चुकूनही खाऊ नका जास्त; अन्यथा शरीर बनेल रोगांचं घर!