येथे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारांतील डेकोरेटिव्ह वस्तू मिळत असून घर सजावण्यासाठी तसेच दिवाळी गिफ्टिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे येथे 100 हून अधिक प्रकारच्या पणत्या ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. या पणत्या विविध रंग, आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असून, दिवाळीच्या सजावटीला एक वेगळीच झळाळी देतात.
advertisement
श्रीजी नॉव्हेल्टीमध्ये लक्ष्मीचे पाऊले 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत, स्वस्तिक आणि शुभ-लाभ 20 रुपयांपासून, रेडिमेड रांगोळी, तोरण 100 रुपयांपासून, वॉल हँगिंग 100 रुपयांपासून आणि लटकन 250 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच क्रिस्टल आयटम्स पूर्णपणे ॲक्रेलिक मटेरिअलपासून बनवले गेले असून, हे आकर्षक डिझाईनमध्ये फक्त 100 रुपयांना दोन युनिट्स या दराने विकले जात आहेत.
हे दुकान केवळ रिटेलसाठी नाही, तर होलसेल दरांवरही वस्तू उपलब्ध करून देते. त्यामुळे कमी गुंतवणुकीत दिवाळी किंवा डेकोरेशन वस्तू व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. दिवाळीच्या तोंडावर घरी सजावट करायची असेल, गिफ्ट घ्यायचं असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल श्रीजी नॉव्हेल्टी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. अधिक माहितीसाठी किंवा खरेदीसाठी आपण ठाणे पश्चिम येथील जांभळी नाका येथे असलेल्या श्रीजी नॉव्हेल्टीला भेट देऊ शकता.