लहान दिसणाऱ्या बदामांमध्ये प्रथिनांचा मोठा साठा असतो. स्नायूंच्या मजबुतीसाठी हा घटक खूप उपयुक्त आहे. बदाम हे एक अतिशय फायदेशीर ड्रायफ्रूट आहे आणि त्याचं योग्य सेवन केलं तर स्नायू मजबूत होऊ शकतात. 5-10 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ले तर शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिनं मिळू शकतात. 35 ग्रॅम बदामांमध्ये 7 ग्रॅम प्रथिनं असतात. हे एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजांच्या 10% पेक्षा जास्त आहे. प्रथिनांव्यतिरिक्त, बदामांमध्ये अँटिऑक्सिडंट्ससह असंख्य पोषक घटक असतात.
advertisement
कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघतच नाही ना? या ट्रिकने चकाचक होतील कपडे
प्रथिनांव्यतिरिक्त बदामांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12, मॅग्नेशियम, तांबं, फॉस्फरस आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे ते शरीरासाठी एक सुपर फूड आहे. बदामामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. बदाम हा व्हिटॅमिन ईचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन ई हृदयरोग आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
Kitchen Jugad : वॉशिंग मशीनमध्ये टाका थंड-थंड दही, झटपट होईल कमाल; पाहून म्हणाल, 'वाह मजा आ गया'
आहारतज्ज्ञांच्या मते, बदामाचं सेवन केल्यानं शरीरात जमा झालेलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यात मदत होते. बदाम रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर आहे. त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं बदाम खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे कॅलरीजचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठीही बदाम प्रभावी ठरू शकतात. तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या भूकेसाठीही बदाम चांगला पर्याय आहे. पण याचं जास्त सेवनही शरीरासाठी योग्य नाही. त्यामुळे बदाम योग्य प्रमाणात खा.