TRENDING:

DIY Cleaner : खिडक्या-किचन-भांडी सर्वकाही स्वच्छ करण्यासाठी बेस्ट! बनवा 'हे' DIY क्लीनिंग सोल्यूशन्स..

Last Updated:

Homemade Cleaning Solutions : तुम्ही घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या साहित्यातून प्रभावी क्लीनिंग सोल्यूशन्स बनवू शकता. याचा वापर करून तुमच्या घरातील खिडक्या, स्वयंपाकघरातील चिकटपणा आणि पूजाघरातील भांडी क्षणार्धात कशी चमकावता येतील, हे जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळीच्या सणाला घराला एक नवी झळाळी देण्यासाठी साफसफाई करणे आवश्यक असते. पण बाजारातील महागड्या आणि रासायनिक क्लीनर्सऐवजी, तुम्ही घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या साहित्यातून प्रभावी क्लीनिंग सोल्यूशन्स बनवू शकता. व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि लिंबूचा वापर करून तुमच्या घरातील खिडक्या, स्वयंपाकघरातील चिकटपणा आणि पूजाघरातील भांडी क्षणार्धात कशी चमकावता येतील, हे जाणून घेऊया. या सोप्या आणि प्रभावी युक्त्या वापरून तुमचे घर नव्यासारखे चमकदार बनवतील.
घरगुती क्लीनिंग सोल्युशन्स
घरगुती क्लीनिंग सोल्युशन्स
advertisement

खिडक्या आणि आरसे चमकावण्यासाठी क्लिनर..

साहित्य : खिडक्यांचे आणि दरवाजांचे आरसे स्वच्छ करून त्यांना चमकवण्यासाठी हे मिश्रण तयार करा. हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे पांढरा व्हिनेगर, 2 कप कोमट पाणी, 1 चमचा कॉर्नस्टार्च आणि 1 कप रबिंग अल्कोहोल लागेल.

वापरण्याची पद्धत : या सर्व सामग्री स्प्रे बॉटलमध्ये घेऊन व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण खिडकी किंवा आरशावर स्प्रे करून एका मऊ कपड्याने पुसा. यामुळे आरसे स्वच्छ आणि चमकदार होऊन जातील.

advertisement

तेलाचे डाग हटवण्यासाठी क्लिनर..

साहित्य : भिंतींवर किंवा स्वयंपाकघरातील पृष्ठभागावर जमा झालेले हट्टी तेलाचे डाग काढण्यासाठी हे मिश्रण प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला 2 कप पाणी, 2 मोठे चमचे लिंबूचा रस, 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चतुर्थांश चमचा कॅस्टाईल सोप लागेल.

वापरण्याची पद्धत : ही सर्व सामग्री एकत्र मिसळा. हे मिश्रण डाग असलेल्या जागी लावून काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्पंज किंवा कपड्याने पुसून टाका. तेलाचे डाग सहज निघतील आणि पृष्ठभाग स्वच्छ आणि ताजेतवाने दिसेल.

advertisement

किचन क्लिनर..

साहित्य : स्वयंपाकघरातील सिंक, फ्रीज, स्टीलची भांडी आणि कुकिंग काउंटर साफ करण्यासाठी हे क्लीनर तयार करा. यासाठी 4 कप कोमट पाणी, 1/4 कप डिशवॉश लिक्विड आणि 1/4 कप बेकिंग सोडा लागेल.

वापरण्याची पद्धत : सर्व साहित्य एकत्र मिसळून क्लीनर तयार करा. हे द्रावण किचन टाईल्स किंवा प्लॅटफार्मवर लावून हलक्या स्पंजने घासा. यामुळे सर्व हट्टी चिकटपणा आणि डाग प्रभावीपणे निघून जातील.

advertisement

तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी क्लिनर..

साहित्य : पूजाघरातील तांब्याची किंवा पितळेची भांडी काळी किंवा निस्तेज पडली असतील तर ती सोन्यासारखी चमकवण्यासाठी हा उपाय करा. यासाठी तुम्हाला आवश्यकतेनुसार लिंबूचा रस आणि थोडेसे मीठ लागेल.

वापरण्याची पद्धत : लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळा आणि हे मिश्रण भांड्यांवर लावा. 5-6 मिनिटांनंतर स्क्रबरने घासून घ्या. या पद्धतीने भांडी नव्यासारखी चमकू लागतील आणि पूजेसाठी तयार होतील.

advertisement

कीटक-कीड्यांना पळवून लावण्यासाठी लिक्विड..

साहित्य : सफाईदरम्यान घरातील कोपऱ्यांमध्ये लपलेले कीटक आणि कोळ्यांना सुरक्षितपणे पळवून लावण्यासाठी हे नैसर्गिक मिश्रण तयार करा. यासाठी तुम्हाला 2 चमचे टी ट्री ऑईल, 2 चमचे कडुलिंबाचे तेल, 1/4 कप बेकिंग सोडा, थोडासा लसणाचा रस आणि 2 कप पाणी लागेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

वापरण्याची पद्धत : हे सर्व साहित्य एकत्र मिसळून लिक्विड तयार करा. हे मिश्रण अशा ठिकाणी टाका जिथे कीटक लपू शकतात. हा उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित आहे, तसेच घर कीटमुक्त ठेवण्यास मदत करतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
DIY Cleaner : खिडक्या-किचन-भांडी सर्वकाही स्वच्छ करण्यासाठी बेस्ट! बनवा 'हे' DIY क्लीनिंग सोल्यूशन्स..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल