मुंबई : महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग म्हणजे मेकअप. मेकअप करायला अनेक महिलांना आवडते. त्यामुळे महिलांचे मेकअपचे साहित्य बाजारात ठीक ठिकाणी विकण्यासाठी असते. कधीच मरण नसलेल्या या व्यवसायाला तुम्ही देखील सहजरीत्या सुरु करू शकता. कमी पैशांमध्ये लेडीज कॉस्मेटिक्सचा व्यवसाय कसा सुरु करायचा याबद्दलच मुंबईतील मंजद दुकानाचे व्यस्थापक मिहिर पटेल यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कसा करावा व्यवसाय?
मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेले मंजद या दुकानात होलसेल दरात सर्व प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करता येईल. या ठिकाणी महिलांच्या आवडीचे लायनर फक्त 10 रुपयात मिळतील. त्याचसोबत लिपस्टिकचा पूर्ण सेट 28 ते 30 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल. मंजद या दुकानाचे व्यस्थापक मिहिर पटेल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जर आपल्याला लेडीज कॉस्मेटिक्सचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपयांचे भांडवल लागते. हा व्यवसाय घरी बसल्या देखील करता येईल.
दादरमध्ये मिळतात 100 रुपयांपासून पैठणी पर्स, हे ठिकाण माहितीये का? PHOTOS
त्याचप्रमाणे रस्त्यालगत स्टॉल लावून हा व्यवसाय उत्तमरीत्या करता येईल. जर आय लाइनर प्रॉडक्ट आपल्याला होलसेलमध्ये 10 रुपये प्रति नग मिळते. रिसेलमध्ये तेच आय लाइनर आपण 40 ते 50 रुपयांना विकू शकतो. होलसेल 28 रुपयांना मिळणारी एक बुलेट लिपस्टिक आपण शंभर ते दीडशे रुपये बाहेर रिसेल करू शकतो, असं मिहिर पटेल सांगतात.
फक्त 6 हजारांपासून मिळतोय लॅपटॉप, इथं खरेदी केल्यास 30 हजारांची बचत
या व्यवसायात मार्जिन रेट अधिक असल्यामुळे प्रॉफिट उत्तम मिळतो. कमीत कमी 25 ते 30 हजार रुपयांचे भांडवल खरेदी करून विकल्यास त्याचा आपल्याला 65 हजार रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो, असंही मिहिर पटेल यांनी सांगितले.