मुंबई : महिलांची फॅशन लक्षात घेता, महिला सध्या शिवलेल्या ब्लाऊज पेक्षा रेडिमेड ब्लाऊजला जास्त प्राधान्य देतात. कारण शिवून घेतलेला ब्लाऊज हा शिवायला वेळ लागतो आणि मुख्य म्हणजे त्याची किंमत ही तशी महाग असते. त्यामुळे एखादी साडी खरेदी केल्यानंतर, वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी महिलांचे पहिले प्राधान्य हे रेडिमेड ब्लाऊज असते. सध्या याच रेडिमेड ब्लाऊजसच्या मोठ्या दुकानांपेक्षा लहान लहान स्टॉलवर महिलांची गर्दी अधिक पाहायला मिळते. गर्दी होते म्हणजे साहजिक आहे हा रेडिमेड ब्लाऊज विकण्याच्या व्यवसायात भरपूर नफा असेल. ते बघता तुम्हाला देखील तुमचा स्वतःचा ब्लाऊज रेडिमेडचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
advertisement
मुंबईतील दादरमध्ये 4 मजली जनता मार्केट हे विविध कपड्यांचे होलसेल मार्केट आहे. या ठिकाणी अगदी सर्व प्रकारचे कपडे होलसेल किंमतीत मिळतात. भारतातील अनेक उद्योजक या ठिकाणाहून मोठ्या संख्येत माल खरेदी करतात आणि त्याचा रिटेल व्यवसाय करतात. याच दुकानांपैकी अनिशा होलसेल ब्लाऊज एक दुकान आहे ज्यात महिलांचे वेगवेगळ्या डिझाईनचे रेडिमेड ब्लॉऊज मिळतात.
एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video
व्यवसाय कसा करावा?
अनिशा होलसेल या दुकानाचे मालक पिंटू मुल्ला यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, या ठिकाणी महिलांचे ब्लाऊज हे फक्त 70 रुपयांपासून खरेदी करता येईल. इतकेच नव्हे तर नवरीचे वर्क केलेले ब्लाऊज देखील या ठिकाणी फक्त 260 रुपयांत मिळतील. 70 रुपयांच्या ब्लाऊज हा कोटनचा सदा ब्लाऊज प्रकार आहे जो रिटेलमध्ये 250 रुपयांत विकता येईल. त्याच प्रमाणे 85 रुपयांत मिळणाऱ्या वर्क केलेल्या ब्लाऊजला रिटेलमध्ये 300 रुपयांत विकता येईल.
मुंबईच्या रस्त्यावर धावतेय कपड्यांचे दुकान, पाहा कसा आहे क्लोथ ट्रक? Video
260 रुपयांत मिळणाऱ्या नवरीच्या ब्लाऊजची किंमत रिटेलमध्ये तब्बल 800- 1000 रुपये एवढी असते. महिला या रेडिमेड ब्लॉऊजेसचा व्यवसाय अगदी घरून देखील करू शकता. यासाठी कमीत कमी भांडवल हे 5 हजार ते 10 हजार रुपयांचं असावे लागते. जागेप्रमाणे आपला ब्लाऊज विकण्याचा प्रयत्न करावा. एका ब्लाऊज पाठी 50 टक्केचे मार्जिन सेट करावे. जेणेकरून त्यात ट्रान्सपोर्ट आणि मेन्टेनन्सचा खर्च निघतो. 10 हजार रुपयांचा माल खरेदी करून विकल्यास त्याचा नफा आपल्याला 30 हजार रुपयांपर्यंत मिळेल, असं पिंटू मुल्ला यांनी सांगितलं.