1) लसीकरण :
हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत आई आणि बालक दोघांच हंगामी आजारांपासून रक्षण करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. जेणेकरून तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या पोटातल्या बाळाला निरोगी ठेऊ शकाल.
advertisement
2) पोषण आहार:
तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंक असलेल्या पोषक घटकांचा समावेश करा. जंकफूड टाळून संतुलित आहार घेतल्याचा फायदा पोटातल्या गर्भाला होईल. व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होईल.
3) स्वत:ला हायड्रेट ठेवा:
हिवाळ्यात थंडीमुळे घाम येत नाही आणि कोरड्या हवेमुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. तहान नाही लागली तरी ठराविक अंतराने पाणी प्या. गरम सूप पिण्याने शरीर हायट्रेडही व्हायला मदत होईल आणि शरीराला योग्य ती पोषक तत्त्वे सुद्धा मिळतील.
4) उबदार कपड्यांचा वापर:
थंडीपासून तुमचा बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करा. जेणेकरून शरीर उबदार ठेवण्यासाठी तुमच्या शरीराला अतिरिक्त शक्ती खर्च करावी लागणार नाही आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही.
हे सुद्धा वाचा : थंडीत गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी, काय करावं आणि काय करू नये? पाहा Video
5) प्रसूतीची पूर्वतयारी:
अनेक महिलांना 9 वा महिला लागल्यानंतर कधीही प्रसूती कळा येऊ शकतात. अशावेळी वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आधीच तुमची एक बॅग भरून ठेवा. त्यात आई आणि बाळ या दोघांसाठी स्वेटर, मोजे आणि ब्लँकेट अशा उबदार कपड्यांच्या समावेश असावा.
6) छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको:
गरोदर महिलांनी हिवाळ्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे सर्दी किंवा फ्लू किंवा डोकेदुखी सारख्या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीर उबदार ठेवण्यासाठी घरातल्या घरात चालणं किंवा स्ट्रेचिंग सारखे साधे सोपे व्यायाम करा.