थंडीत गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी, काय करावं आणि काय करू नये? पाहा Video

Last Updated:

डिलिव्हरीसाठी हिवाळा हा अतिशय चांगला काळ मानला जातो. हा काळ जरी गरोदरपणासाठी चांगला असला तरी गरोदर स्त्रीने या काळात काही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात घ्या विशेष काळजी.

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी 
नाशिक : गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. पण डिलिव्हरीसाठी नेमका उत्तम काळ कोणता याचे उत्तर मात्र बऱ्याच स्त्रियांना माहीत नसते. कोणी म्हणतं उन्हाळा चांगला, कोणी म्हणतं पावसाळा चांगला, तर कोणी म्हणतं हिवाळा. पण हे मात्र खरं आहे की यापैकी कोणता तरी एकच ऋतू चांगला असतो आणि तो ऋतू म्हणजे हिवाळा होय. हो मंडळी, डिलिव्हरीसाठी हिवाळा हा अतिशय चांगला काळ मानला जातो. हा काळ जरी गरोदरपणासाठी चांगला असला तरी गरोदर स्त्रीने या काळात काही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. गरोदर महिलांनी हिवाळ्यात काळजी कशी घ्यावी? याबद्दलचं  नाशिक येथील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रशांत महाजन यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
कशी घ्यावी काळजी? 
थंड आणि सुकी हवा यामुळे त्वचा आपले नैसर्गिक मॉइश्चर आणि त्यातील तेल हरवून बसते. पोट वाढल्यावर सुद्धा त्वचेला तडे द्यायला सुरुवात होते. यामुळे अनेक स्त्रियांना वेदना देखील होतात. याच कारणामुळे गरोदर स्त्रियांच्या पोटावर जास्त स्ट्रेच मार्क्स येतात. यापासून त्वचेचा बचाव करायचा असेल तर गरोदर स्त्रीने त्वचेवर क्रीम आणि लोशन वेळोवेळी लावत राहावे. यामुळे स्किन हायड्रेट राहते, असं प्रशांत महाजन सांगतात.
advertisement
सर्वत्र हिवाळ्यात वातावरण थंड असते. त्याकरता पिण्याचे पाणी पिलं जात नाही. तहान लागते परंतु पाणी पिण्याची इच्छा होत नाही. तर असे बिलकुल करू नका. दिवसभर खूप पाणी प्या. हवं तर घोट घोट पाणी वारंवार पित रहा. महिलांना गरम पाणी पिण्याची सवय असते. आणि गरम पाण्याने आपली तहान भागत नाही. याकरता दिवसातून 4 वेळेस गरम पाणी पित असला तर ते कमी करा. यामुळे शरीराचे तापमान देखील योग्य बदल घडवते जेणेकरून पोटातील बाळाला देखील मदत मिळते, असं प्रशांत महाजन सांगतात. 
advertisement
जास्त पाणी पिल्याने जास्त वेळा लघवीला होते आणि आणि हिवाळ्यात वारंवार झोपणं मोडून लघवीला जायला कंटाळा येते. खास करून गर्भवती स्त्रीसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे गर्भवती स्त्री कमी पाणी सेवन करतात ती मोठी चूक ठरू शकते. गरोदरपणात शरीराला जास्त पाणी लागत असते. जर गरोदरपणात डिहायड्रेशन झाले तर बाळाला आवश्यक असणारे अ‍ॅम्निओटिक फ्लुइड कमी होऊ शकते. यामुळे मुदतपूर्व डिलिव्हरीचा धोका उद्भवत असतो. तसेच यामुळे डिलिव्हरीनंतर आईचे दूध सुद्धा कमी होण्याचा धोका असतो.
advertisement
थंडीत शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो. यामुळे त्वचेतील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण होऊ शकते. याशिवाय हात आणि पायांवर खाज, लाल चट्टे, सूज आणि पुळ्या देखील येऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या पायांना चांगल्या प्रकारे झाकून ठेवा. कोमट पाण्यामध्ये पाय टाकून बसल्याने पायांना आराम मिळतो. हिवाळ्यात गरोदरपणा आल्यावर पायांचा त्रास अनेक स्त्रियांना जाणवतो. त्यामुळे आवर्जून या साध्या सोप्या उपायाचा वापर प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे, असं प्रशांत महाजन सांगतात. 
advertisement
 गरोदरपणात फ्लू शॉट लावून घेतल्याने आई आणि बाळ दोघांना फ्लू पासून सुरक्षा मिळते. जाणकारांच्या मते फ्लू शॉट घेतल्याने तुम्ही तुमच्या बाळाला जन्मानंतर 6 महिन्यांपर्यंत फ्लू होण्यापासून वाचवू शकता. फ्लू व्हॅक्सीनमुळे गरोदर स्त्रियांमध्ये अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इंफेक्शनचा धोका कमी होतो. ही टिप्स प्रत्येक गरोदर स्त्रीसाठी महत्त्वाची असून डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येक गरोदर स्त्रीने फ्लू व्हॅक्सीन लावून घेतले पाहिजे. जेणेकरून बाळ आणि आई दोघेही सुरक्षित राहतील.
advertisement
 गरोदरपणात तुम्ही संतुलित आहार घ्यायला हवा ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असायला हवा. फळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीला मजबूत ठेवण्याचे काम करतात. आवळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक सक्षम करणारे व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. आवळ्याचा ज्यूस हा मॉर्निंग सिकनेस, मळमळ, अपचन आणि गरोदरपणातील अन्य त्रासदायक समस्यांना कमी करण्यात मदत करू शकतो. तुम्ही पालक, मेथी आणि कांद्याच्या पातीसारख्या भाज्यांचा सुद्धा आहारात समावेश करू शकता, असंही प्रशांत महाजन सांगतात. 
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीत गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी, काय करावं आणि काय करू नये? पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement