KEM ते सायन, मुंबई महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय, 3 वर्षांत 30 कोटी मोजणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai News: मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता या क्षेत्रातही खासगी तत्वावर सुरक्षारक्षक नेमण्यात येतील.
मुंबई: सध्या विविध क्षेत्रांत खासगीकरणाचे प्रमाण वाढले आहे. अशातच मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा स्वतंत्र सुरक्षारक्षक विभाग असताना महापालिकेच्या रुग्णालयांना खासगी सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. आता केईएम, नायर, सायन रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडून सुरक्षा रक्षक घेण्यात येतील. विशेष म्हणजे यावर तीन वर्षासाठी 30 कोटी 12 लाख 84 हजार रुपये खर्च होणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह विभाग कार्यालय आणि अन्य मालमत्तांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र सुरक्षा विभाग कार्यरत आहे. मात्र, या सेवेत देखील आता खासगीकरणाचे वारे वाहत आहे. याच पार्श्वभूमावर आता महापालिकेच्या रुग्णालयात 250 सुरक्षा रक्षकांची नेमणूक खासगी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
advertisement
वार्षिक खर्च 10 कोटींच्या वर
view commentsमहापालिकेच्या रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी सुमारे 250 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येईल. प्रत्येक महिन्याला त्यासाठी 83 लाख 69 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे वार्षिक खर्च सरासरी 10 कोटी 4 लाख 28 हजार रुपयांवर जाणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनला याचे 3 वर्षांसाठीचे कंत्राट दिले असून त्यासाठी पालिकेला 30 कोटी 12 लाख 84 हजार रुपये द्यावे लागतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
KEM ते सायन, मुंबई महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय, 3 वर्षांत 30 कोटी मोजणार


