झोपण्याची चुकीची स्थिती किंवा तहान लागली म्हणून किंवा शौचालयात जाण्यासाठी, तर कधी एखादं वाईट स्वप्न पडल्यामुळे जागं येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री एक ते तीनच्या दरम्यान जागं होणं आणि नंतर पुन्हा झोप न लागणं याची अनेक कारणं असू शकतात. यातली शारीरिक आणि मानसिक कारणं समजून घेऊयात.
Arthritis : जागतिक संधिवात दिन, संधिवात रोखण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय
advertisement
रात्री जाग येण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये शारीरिक आणि मानसिक कारणं तसंच काही वैद्यकीय कारणांचा समावेश आहे.
वाढणारं वय - वाढत्या वयाचा झोपेवर परिणाम होतो. वयानुसार आपलं झोपेचं चक्र बदलतं. यामुळे आपल्याला रात्री जाग येऊ शकते.
ताण - ताणामुळे शरीरातील विशिष्ट मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे मध्यरात्री जाग येते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे रक्तदाबात बदल होतो आणि हृदय गती वाढते.
औषधांचे दुष्परिणाम - विविध वैद्यकीय कारणांसाठी दीर्घकाळ औषधांचा वापर केल्यानं झोपेवर परिणाम होऊ शकतो. रात्री अचानक जागं होणं हे देखील एक प्रमुख कारण असू शकतं. कधीकधी डिकंजेस्टंट्स आणि अँटीडिप्रेसेंट्स सारख्या औषधांचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.
यकृताच्या समस्या - पहाटे एक ते तीनच्या दरम्यान उठलात तर यकृताचे कार्य बिघडणं हे त्याचं कारण असू शकतं. यकृत बिघडल्यानं रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. ताणतणावामुळे यकृताचं कार्य देखील बिघडू शकतं.
Hyperpigmentation : चेहऱ्यावरचे काळे डाग कमी कसे करायचे ? हे तीन उपाय वापरुन बघा
याशिवाय, इतर अनेक आजारांमुळे रात्री झोप येत नाही. यात गॅस्ट्रिक आर्थरायटिस, नैराश्य, न्यूरोपॅथी, रजोनिवृत्ती, प्रोस्टेट, कमी सक्रिय असलेल्या थायरॉईड ग्रंथी आणि स्लीप एपनिया यांचा समावेश आहे.
हा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. रात्री उठलात तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शांत राहा आणि जास्त काम करू नका. सतत घड्याळ तपासणं आणि झोप का येत नाही याचा विचार करणं यामुळे चिंता आणि ताण वाढू शकतो. अशावेळी खोल श्वास घ्या किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
बेडरूममधलं वातावरण आणि बेडची स्थिती देखील झोपेत व्यत्यय आणू शकते. याकडे लक्ष द्या. बेडरूम आणि बेड स्वच्छ आणि नीटनेटके असले पाहिजेत. बेडवर झोपताना, हळू, खोल श्वास घ्या आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. वीस मिनिटांत झोप येत नसेल, तर अंथरुणावरुन उठा आणि पुस्तक वाचणं किंवा हलकं संगीत ऐकणं यासारख्या गोष्टीत वेळ द्या. या काळात मोबाईल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं टाळा. यामुळे झोपेत बाधा येऊ शकते.