गेल्या तीन-चार वर्षांत हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसणाऱ्या तरुणांना चालताना, नाचताना, बोलताना हृदयविकाराचा झटका येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचे जीव जात आहेत. देशात हे रुग्ण सतत वाढत आहेत, जे चिंतेचा विषय आहे. आता एका हार्टच्या डॉक्टरलाही कर्तव्य बजावत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागत आहे. वैद्यकीय जगात ही घटना अत्यंत चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
Heart Attack : पाठीत दुखतंय, येऊ शकतो हार्ट अटॅक, पाठ आणि हृदयाचा संबंध काय? डॉक्टरांनीच सांगितलं
चेन्नईतील एका प्रसिद्ध कार्डियाक सर्जनचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 39 वर्षीय हृदयविकार सर्जन डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचं कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डॉ. ग्रॅडलिन रॉय हे चेन्नईतील सेवाथा मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट कार्डियाक सर्जन म्हणून काम करत होते. बुधवारी ते हॉस्पिटलमध्ये राऊंडवर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते जमिनीवर पडले. तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते डॉ. रॉय यांचे प्राण वाचवू शकले नाहीत, अशी माहिती टीव्ही9 भारतवर्षच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत, हृदयविकाराची कारण आणि लक्षणं आधीच जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण वेळेवर वाचवू शकाल.
अचानक हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?
मेयो क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जेव्हा तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा आणि प्लेक (चरबी, कोलेस्टेरॉल) असतो तेव्हा हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो. जेव्हा प्लेक फुटतो तेव्हा रक्ताची गुठळी तयार होते, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन पुरवणारा रक्तप्रवाह थांबतो. कधीकधी जास्त धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अस्वस्थ खाण्याच्या सवयी यामुळे देखील हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
Heart Attack : हार्ट पेशंटने कसं जेवायचं? जेवणाची योग्य पद्धत, जेवताना या चुका कधीच करू नका
हृदयविकाराचा झटका येण्याचे जोखीम घटक
-खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
-अति धूम्रपान आणि मद्यपानामुळे देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
-उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार हृदयावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात.
-कुटुंबात कोणाचाही इतिहास असल्यास हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.
-जास्त ताण घेणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ताणामुळे हृदयावर ताण वाढतो.
हृदयविकाराची लक्षणं
छातीत दुखणं
अस्वस्थ वाटणं
हात, जबडा, मान, पाठ दुखणं
श्वास घेण्यास त्रास होणं
उलट्या होणं
मळमळ होणं
चक्कर येणं
जास्त घाम येणं