दह्याचे फायदे:
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, त्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. दही खाल्ल्याने शरीराला एन्झाइम्सचा पुरवठा होतो. एन्झाइम्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रोज एक वाटी दही खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. दह्यामध्ये असलेलं कॅल्शियम आपले दात आणि हाडांसाठी फायदेशीर असते. दही आपल्या शरीरातील हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करतं.
advertisement
तुपाचे फायदे:
रोज तूप खाल्ल्याने हार्ट डिसीजेस टाळता येतात. तूप खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहते. तुपामध्ये हेल्दी फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. त्यामध्ये ए, ई आणि डी सारखी चरबी विरघळवणारी जीवनसत्त्वे असतात. हे घटक आपलं एकूण आरोग्य चांगलं राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? डोकेदुखीवर सतत पेन किलर घेणं पडेल महागात, तज्ज्ञांनीच सांगितले धोके
दही आणि तूप एकत्र का खाऊ नये?
दही आणि तूप एकत्र न खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. दोन्ही पदार्थ दुधापासून तयार झालेले असले तरी त्यांचे अंगभूत गुणधर्म वेगळे आहेत. दही थंड असते तर तूप शरीराला उष्णता देते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जे लोक दह्यासोबत तूप लावलेले पराठे खातात त्यांना पोट फुगण्याची किंवा गॅसची समस्या जाणवते. पोटात दोन्ही गोष्टी एकत्र पचण्यास त्रास होत असल्याने ही समस्या जाणवते.
दही आणि तूप एकत्र खाल्यास अन्न पचन होण्यास त्रास, हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीजेस आणि स्किन अॅलर्जीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दह्यासोबत आणखी काय खाऊ नये?
दह्यासोबत लिंबू आणि संत्र्यासारखी आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये. आयुर्वेदात दही आणि खरबूज एकत्र न खाण्याचा सल्ला दिला आहे. दह्यासोबत पनीर आणि कारलं खाऊ नये.