TRENDING:

Dry Skin : बदलत्या हवामानात घ्या त्वचेची काळजी, ही जीवनसत्त्वं सगळ्यात महत्त्वाची

Last Updated:

त्वचेसाठी आवश्यक आर्द्रता केवळ बाह्य उत्पादनांमुळे नसते. त्याला जबाबदार त्वचेतले आतलेही घटकही असतात. शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते तेव्हा त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो. यामुळे त्वचा खरखरीत, कोरडी आणि निर्जीव दिसते. हे टाळण्यासाठी कोणती जीवनसत्वं महत्त्वाची आहेत ते समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यावर्षी उशीरा संपलेला पाऊस, नंतर अचानक वाढलेलं ऊन आणि नंतर येणारी थंडी. या बदलत्या हवामानात अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. श्वसनाच्या समस्या जाणवतात. त्यातल्याच एक म्हणजे त्वचेच्या समस्या.
News18
News18
advertisement

हिवाळा सुरू होताच, बहुतेकांना कोरड्या त्वचेची तक्रार जाणवते. चेहऱ्यावरील ताण, खाज आणि कोरडेपणा कधी कधी इतका वाढतो की कोणत्याही क्रीमचा उपयोग होत नाही. पण अनेकदा फक्त हवामान नाही तर शरीरातल्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही हा त्रास जाणवू शकतो.

त्वचेसाठी आवश्यक आर्द्रता केवळ बाह्य उत्पादनांमुळे नसते. त्याला जबाबदार त्वचेतले आतलेही घटकही असतात. शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते तेव्हा त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो. यामुळे त्वचा खरखरीत, कोरडी आणि निर्जीव दिसते. हे टाळण्यासाठी कोणती जीवनसत्वं महत्त्वाची आहेत ते समजून घेऊया.

advertisement

Hair Mask : केस गळती थांबवणारे हेअर मास्क, केसांच्या वाढीसाठी खास टिप्स

त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी चार जीवनसत्त्वं महत्त्वाची भूमिका बजावतात - जीवनसत्त्वं अ, ड, ई आणि क.

त्वचेच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि नैसर्गिक तेल उत्पादनासाठी जीवनसत्त्व अ आवश्यक आहे. या कमतरतेमुळे त्वचा खडबडीत होऊ शकते.

व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. त्वचेच्या बाह्य थराचं संरक्षण यामुळे होतं आणि ओलावा टिकवून ठेवणं शक्य होतं.

advertisement

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, जळजळ आणि सूज येऊ शकते. उन्हात बाहेर राहत असाल तर हे प्रमाण जास्त होतं.

व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करतं, त्वचा मजबूत आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी ते उपयुक्त आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि निर्जीव दिसू शकते.

Diet Tips : एकवीस दिवस पाळा हे नियम, वजन कमी होण्यासाठी खूपच फायदेशीर

advertisement

या जीवनसत्वांची कमतरता जाणवू नये यासाठी आहारात काही घटक नक्की समाविष्ट करा.

व्हिटॅमिन ए: गाजर, रताळं, पालक, फणस, आंबा.

व्हिटॅमिन ई: बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, हिरव्या भाज्या.

व्हिटॅमिन डी: चरबीयुक्त मासे, अंड्याचा पिवळा भाग, दूध तसंच सूर्यप्रकाशात म्हणजे अगदी ऊन नाही पण कोवळ्या उन्हात बसा.

व्हिटॅमिन सी: संत्री, लिंबू, पेरू, किवी आणि ब्रोकोली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं देखील तितकंच महत्वाचं आहे. शरीर डिहायड्रेट होतं तेव्हा कोणतंही मॉइश्चरायझर काम करत नाही. त्यामुळे त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या जीवनसत्त्वांचा समावेश करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Skin : बदलत्या हवामानात घ्या त्वचेची काळजी, ही जीवनसत्त्वं सगळ्यात महत्त्वाची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल