TRENDING:

Diwali : दिवाळीत फराळ करा पण प्रमाणात, खास मधुमेहींसाठी डॉक्टरांनी दिल्यात खास टिप्स

Last Updated:

पूर्वी फराळासारखे पदार्थ खास सणाला केले जायचे. पण आजकाल नेहमीपेक्षा जास्त तळलेले पदार्थ एरवीही खाल्ले जातात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी सावधगिरी बाळगणं जास्त आवश्यक आहे. यासाठी, तुमच्या आहाराकडे, औषधांवर आणि दैनंदिन दिनचर्येकडे दिवाळीतही लक्ष द्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळी म्हणजे खमंग फराळ, गोड पदार्थ आलंच. हे पदार्थच इतके खास असतात की, खावेसे वाटतात. पण दिवाळीत, विशेषतः मधुमेह असलेल्यांना, थोडासा निष्काळजीपणा देखील रक्तातील ग्लुकोज वाढवू शकतो.
News18
News18
advertisement

पूर्वी फराळासारखे पदार्थ खास सणाला केले जायचे. पण आजकाल नेहमीपेक्षा जास्त तळलेले पदार्थ एरवीही खाल्ले जातात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी सावधगिरी बाळगणं जास्त आवश्यक आहे. यासाठी, तुमच्या आहाराकडे, औषधांवर आणि दैनंदिन दिनचर्येकडे दिवाळीतही लक्ष द्या.

सणासुदीच्या औषधं वेळेवर घेणं विसरु नका. दिवाळीच्या दिवसांतही आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. एरवी पण आणि पाहुण्यांच्या गर्दीतही औषधं विसरु नका. कारण औषधं वेळेवर घेतली नाहीत किंवा ती घेणं विसरलात तर साखरेची पातळी बिघडू शकते.

advertisement

Diwali : दिवाळीसाठी खास स्किन केअर टिप्स, सोपे - पटकन करता येणारे फेसपॅक

सध्या विदाऊट शुगर म्हणजे साखर नसलेले गोड पदार्थांना विशेष पसंती आहे. तरीही गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच खा. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी तुम्ही ज्या जीवनशैलीचं पालन करत आहात त्यात बदल होणार नाही याची काळजी घ्या.

सध्याचा आहार सुरू ठेवा आणि जास्त कॅलरी असलेले, तळलेले पदार्थ खाणं टाळा. या गोष्टी लक्षात ठेवाच पण तुम्ही घेत असलेल्या कोणत्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यायला विसरु नका. ते नियमितपणे घेतलं तर तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि कोणत्याही समस्या येणार नाहीत. यामुळे तुमची दिवाळीही चांगली होईल.

advertisement

गोड पदार्थांच्या जागी सुक्या मेव्याचा विचार करु शकता पण कमी प्रमाणात खा. कारण, काजूसारखा जास्त सुका मेवा खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.

Ghee Benefits : सर्वांगासाठी प्राचीन उपाय, तुपाच्या वापराच्या सात 

सुकामेवा कमी प्रमाणात खाल्ल्यानं कोणतीही समस्या उद्भवणार नाही. सुकामेव्यात चरबीचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आहारतज्ज्ञांनी दिलेला डाएट प्लॅन नक्की फॉलो करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

यासोबतच सक्रिय राहणं आणि दिनचर्येत योगा आणि व्यायामाचा समावेश केल्यानं चांगलं आरोग्य सुनिश्चित होईल. दिवाळीच्या पार्ट्यांमधला एक भाग म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोलमुळे समस्या आणखी वाढू शकतात कारण त्यात कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे अन्न कमी प्रमाणात पोटात जातं. तळलेले पदार्थ किंवा जास्त मीठामुळे रक्तदाब वाढू शकतो. सर्वकाही मर्यादेत असेल तर तुम्ही आनंदाने सण साजरा करू शकाल. यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : दिवाळीत फराळ करा पण प्रमाणात, खास मधुमेहींसाठी डॉक्टरांनी दिल्यात खास टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल